esakal | बिग बी बॅक, सोशल मीडियावर फोटो शेअर; चाहत्यांना धन्यवाद
sakal

बोलून बातमी शोधा

actor amitabh bachchan resumed work after his eye surgery navya naveli nanda

अमिताभ यांचा जो फोटो शेअर झाला आहे त्यात त्यांनी एक ट्रॅक सुट घातला आहे.

बिग बी बॅक, सोशल मीडियावर फोटो शेअर; चाहत्यांना धन्यवाद

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचे महानायक अमिताभ  बच्चन हे सोशल मीडियावर चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहेत. आपल्या चित्रपटांतून जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी म्हणून त्यांची सगळीकडे चर्चा आहे. त्याचे काय आहे की, आता अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्या फोटोला त्यांची नात नव्या नवेली नंदानं कमेंटही केली आहे. अमिताभ यांनी इंस्टावर जो फोटो शेअर केला आहे त्यात ते एका सोफ्यावर बसलेले दिसत आहेत आणि त्यांच्यासमोर माईक आहे. फोटोबरोबर अमिताभनं संगीत हे आपले प्रेम असल्याचे म्हटले आहे.

अमिताभ यांचा जो फोटो शेअर झाला आहे त्यात त्यांनी एक ट्रॅक सुट घातला आहे. आणि ते आराम करण्याच्या मुडमध्ये आहे. त्यांच्या त्या पोस्टला नव्या नवेली नंदा यांनी एक कमेंट केली आहे. तिनं अमिताभ यांना आय लव यु असे म्हटले आहे. आणि हार्टवाला एक इमोजीही शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी आपल्या परिवारामध्ये महिला सदस्यांचा फोटो शेअर केला होता. त्यात त्यांची आई तेजी बच्चन, मुलगी श्वेता बच्चन, पत्नी जया बच्चन, सुन ऐश्वर्या राय बच्चन. नात नवेली नंदा आणि आराध्या बच्चन यांचा फोटो शेअर केला होता. त्याला चाहत्यांनी मोठी पसंती दर्शवली होती.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांची डोळ्यांची सर्जरी झाली आहे. त्याची माहिती अमिताभ यांनी व्टिट केली होती. त्याचबरोबर चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी चाहत्यांना धन्यवाद दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, जरी दृष्टीहीन असेल तरी दिशाहीन नाही, सुविधाहीन असलो तरी असुविधाहीन नाही. मला एक सांगावेसे वाटते की, मला सर्वांचे प्रेम मिळते आहे याचा आनंद वाटतो. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच माझ्या पाठीशी राहतील.

 
 
 
 
 
 

loading image