esakal | 'कोरोनाचं भान ठेवा, फोटोशुट कसलं करताय, संवेदनशील व्हा'
sakal

बोलून बातमी शोधा

Anu Kapoor

'कोरोनाचं भान ठेवा, फोटोशुट कसलं करताय, संवेदनशील व्हा'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोना वाढता कहर सर्वांची डोकेदुखी वाढवत आहे. या जीवघेण्या आजाराला सामोरं जाण्यासाठी शासकीय पातळीवरुन प्रयत्नही सुरु आहेत. मात्र अजून त्यात म्हणावे यश आले नसल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी काही सेलिब्रेटींनी कोरोनाच्या काळात लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहनही केले आहे. अद्याप काही सेलिब्रेटी सोशल मीडियावर फोटो सेशन करण्यात रमल्याचं दिसून आलं आहे. त्यांना बॉलीवूडमधील एका ज्येष्ठ अभिनेत्यानं खडसावलं आहे. ( actor annu kapoor slams celebrities sharing vacation photos said it like eating 56 bhog in front of starving one)

कोरोना सारखी महामारी असताना दुसरीकडे सेलिब्रेटी आपले फोटोसेशन करण्यात गुंग असल्याचे दिसून आल्यावर त्यावर प्रसिध्द अभिनेते अनु कपूर ( actor annu kapoor ) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी परखड शब्दांत ग्लॅमरस सेलिब्रेटींना सुनावले आहे. ते म्हणाले जे उपाशी आहेत त्यांच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खात असल्याचे फोटो टाकून काय साध्य करायचं आहे. सेलिब्रेटींना काहीच कसं कळत नाही. अशा आशयाचे बोल त्यांनी सुनावले आहे.

कोरोनामुळे आतापर्यत हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अद्याप व्हॅक्सिनेशनचा प्रश्न सुटलेला नाही. अनेकांना व्हॅक्सिन घेता आलेले नाही. अशी गंभीर परिस्थिती असताना चित्रपट कलाकार व्हॅकेशन सुट्टीचा आनंद घेत त्याचे फोटो (celebrities sharing vacation photos ) सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यांनी आपले फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले आहेत. या प्रकारावरुन अन्नु कपूर नाराज झाले आहेत.

हेही वाचा: अगंबाई सुनबाई मालिकेतील अद्वैत दादरकरचा माफीनामा;पाहा व्हिडिओ

हेही वाचा: सूर्यवंशी, बेल बॉटम एकाच दिवशी रिलीज होणार? अक्षय म्हणाला...

अनु कपूर यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ज्यावेळी आपल्याकडे गंभीर परिस्थिती हे माहिती असतानाही त्यांनी व्हॅकेशनचे फोटो शेअर करणं चूकीचे आहे. त्यांनी अधिक संवेदनशील व्हायला हवे.

loading image