आयुषमान म्हणतो, 'पार्टीमध्ये गाणी गायला, नाचायलाही तयार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ayushmann khurrana

आयुषमान म्हणतो, 'पार्टीमध्ये गाणी गायला, नाचायलाही तयार'

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुरानाने (ayushmann khurrana) बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण केली. त्याच्या बधाई हो, अंधाधुन आणि बाला या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतीच आयुषमानने अरबाज खानच्या पिंच या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये आयुषमानने बॉलिवूडमधील त्याच्या करिअरबद्दल सांगितले. (actor ayushmann khurrana talk about his struggle in bollywood)

पिंच या शोमध्ये अरबाजने आयुषमानच्या 'My Journey in Bollywood' या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या पुस्तकावर वाचकांनी केलेल्या काही कमेंट्स वाचल्या. या कमेंट्समध्ये अनेकांनी असे लिहीले होते की , स्वत:च्या बॉलिवूड करिअरबद्दल आयुषमानने खूप लवकर पुस्तक लिहिले. यावर उत्तर देत आयुषमान म्हणाला, 'माझ्या पहिल्या चित्रपटानंतर मी तीन फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले. लोक मला कुठल्याच चित्रपटामध्ये स्विकारत नव्हते. त्यामुळे मी चंढीगडला परत जाण्याची तयारी केली. मी जिवनाच्या अशा टप्प्यावर होतो, जिथे मला पुस्तक लिहायला खूप वेळ होता. त्यामुळे मी ते पुस्तक लिहीले.'

पुढे आयुषमान म्हणाला, 'पण मी आता अशा टप्प्यावर आहे जिथे माझ्याकडे पुस्तक लिहायला आजिबात वेळ नाही. मी काम पण चांगलं करत आहे. त्यावेळी मी काहीच काम करत नव्हतो. मला काम करायचे होते. 'आयुष्मान भव' नावाचा माझा एक बॅंड होता. त्या बॅंड बरोबर मी संगीत कार्यक्रम करत होतो. त्यामुळे मी असा विचार केला की, माझे चित्रपट जर फ्लोप झाले तर मी लोकांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गाण म्हणायचं आणि नाचायचं काम करून लोकांचे मनोरंजन करू शकेन.'

हेही वाचा: 'बचपन का प्यार' गाण्यामुळे अनुष्का शर्माची झोप उडाली

हिंदी रिअ‍ॅलिटी शो रोडीजनंतर अनेक वर्ष आयुषमानने 'आर जे' चे काम केले. त्यानंतर 2012 मध्ये त्याने विक्की डोनर या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नौटंकी साला,बेवकूफिया आणि हवाईजादा या चित्रपटांमध्ये आयुषमानने काम केले.

हेही वाचा: प्रेमाला कुठे असते Expiry Date? मीरा आणि आदिराजची लव्ह स्टोरी

loading image
go to top