मुंबईच्या मुसळधार पावसात अभिनेते भारत गणेशपुरेंचा मोबाईल चोरीला, सांगितला धक्कादायक अनुभव

bharat ganeshpure
bharat ganeshpure

मुंबई- मुंबईत गेल्या २ ते ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबतंय तर हायववर गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायेत. मात्र याच संधीचा फायदा घेत भुरट्या चोरांचं तुमच्यावर चांगलंच लक्ष आहे. असंच काहीसं घडलंय 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेते भारत गणेशपुरे यांच्याबाबतीत. गणेशपुरे यांचा मोबाईल चोरट्यांनी गाडीतून हिसकावून नेला आहे. याबाबतची माहिती स्वतः गणेशपुरे यांनी व्हिडिओ शेअर करत दिली आहे तसंच अशा परिस्थितीत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

अभिनेते भारत गणेशपुरे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या त्यांच्यासोबत घडलेला चोरीचा प्रसंग सांगितला आहे. ते म्हणतात, 'आज माझा मोबाईल अक्षरक्षः लूटून नेलेला आहे. ही घटना घडली कांदिवली येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर. खूप पाऊस होता, खूप ट्रॅफिक होतं दरड कोसळ्यामुळे. यावेळी दोन माणसं आली आणि विचीत्र पद्धतीने माझी गाडी ठोकली. पण मी काच उघडली नाही. मात्र दुस-या बाजुला असलेल्या माणसाने काच उघडली त्याचवेळी गाडीबाहेर उभ्या असलेल्या एका माणसाने चित्रविचित्र हावभाव करायला सुरुवात केली. मी त्याच्याकडे पाहत असतानाच माझ्या बाजुचा दरवाजा उघडून माझा मोबाईल चोरुन नेला.'

भारत गणेशपुरे पुढे सांगतात की, 'माझा दरवाजा लॉक करायला विसरलो होतो. तेव्हा माझ्या चुकीमुळे म्हणा किंवा त्या चोरांमुळे माझा मोबाईल गेला. हे माझ्यासोबत घडलं आहे तेव्हा तुम्ही सावध राहा. सध्या परिस्थिती फार वाईट आहे. जर तुम्हाला कसला संशय आला तर पहिले गाडी लॉक करा आणि काचा उघडू नका. तुम्हाला कोणी निर्दयी म्हटलं तरी चालेल. सध्या दिवस फार वाईट आहेत. या टोळीमध्ये बायका, लहान मुलं, मोठी मुलं यांचा समावेश आहे. ही टोळी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही गाडीतून उतरु नका. माझा मोबाईल माझ्या मुर्खपणामुळे गेला. म्हणून मी तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहे.'

गणेशपुरे यांनी पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनीही त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र तरीही प्रवासात प्रत्येकाने काळजी घ्या अशी विनंती गणेशपुरे यांनी केली आहे.   

actor bharat ganeshpure share bad experience of thieving mobile in mumbai  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com