सुशांतचा कुत्रा 'फज'ला आहे अजुनही सुशांत परतण्याची आशा, पाहा व्हिडिओ

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 7 August 2020

सुशांतची बहिण श्वेताने फजचा फोटो शेअर केला होता ज्यामध्ये फज सुशांतच्या वडिलांसोबत दिसून आला होता. आता सुशांतची भाची मल्लिकाने फजचा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर त्याचे चाहते सुशांतचा कुत्रा फजसाठी दुःखी आहेत. काही दिवसांपूर्वी सुशांतची बहिण श्वेताने फजचा फोटो शेअर केला होता ज्यामध्ये फज सुशांतच्या वडिलांसोबत दिसून आला होता. आता सुशांतची भाची मल्लिकाने फजचा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

सुशांत केस ब्रेकिंग- ईडी कार्यालयात पोहोचली रिया चक्रवर्ती

सुशांत त्याच्या कुत्र्यावर खूप प्रेम करायचा. सुशांतच्या मृत्युनंतर त्याचा कुत्रा फजचा व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये तो सुशांतचा फोटोकडे पाहत उदास बसला होता. आता सुशांतची भाची मल्लिकाने फजला एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिलंय, आजही जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा तो मोठ्या आशेने दरवाजाकडे पाहत बसतो. या व्हिडिओमध्ये सुशांतचा फज अजुनही उदास दिसतोय. 

सुशांतच्या चाहत्यांना अजुनही विश्वास बसत नाहीये की सुशांत आता आपल्यात नाही.  तर सुशांतचा कुत्रा फज आजही त्याच्या येण्याची आस लावून बसला आहे.सुशांतचं फजवर खूप प्रेम होतं. तो जिथे शक्य असेल तिथे फजला सोबत घेऊन जायचा. सुशांतच्या सोशल मिडियावर देखील त्याचे फजसोबत मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ आहेत.  सुशांतच्या फजचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेकांना भावूक करतोय. 

sushant singh rajput niece share a video of his dog fudge  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput niece share a video of his dog fudge