
दिल्लीत झालेल्या शेतक-यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. यावेळी काही शेतक-यांनी लाल किल्ल्यावर निषेधाचे झेंडे फडकवले.
मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता सनी देओल हा त्याच्या रागीट स्वभावामुळे प्रसिध्द आहे. त्याच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये त्यानं केलेल्या भूमिका या कमालीच्या रागीट वृत्तीच्या आहेत. अन्यायाविरोधात लढताना सनीचा अभिनय सर्वांनी पडद्यावर पाहिला आहे. वास्तव आयुष्यातही त्याच्या रागीटपणाची झलक पाहायला मिळते. त्याचा परिचय एकेकाळी जवळचा मित्र असणा-या दीप सिध्दुला आला आहे.
बीजेपीचा खासदार असणारा सनी दीप सिध्दुवर कमालीचा भडकला आहे. त्यामुळे त्याने त्याच्याशी संबंध तोडण्याची भाषा केली आहे. 2019 मध्ये सनीनं पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्याला तिथून मोठ्या प्रमाणात मते मिळाली आणि तो विजयी झाला. तेव्हापासून दीप सिध्दू हा त्याचा जवळचा सहकारी होता. मात्र एका प्रकरणानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. तो टोकाला गेला आहे. सनीनं याविषयी व्टिट करुन माहिती दिली आहे. दीप आणि सनी यांच्यात त्या निवडणूकीनंतर दुरावा वाढत गेल्याचे दिसून आले आहे. त्याचे कारण म्हणजे दीपनं शेतक-यांच्या आंदोलनाला दिलेला पाठींबा आणि त्यात घेतलेला सक्रिय सहभाग हे आहे.
आज लाल क़िले पर जो हुआ उसे देख कर मन बहुत दुखी हुआ है, मैं पहले भी, 6 December को ,Twitter के माध्यम से यह साफ कर चुका हूँ कि मेरा या मेरे परिवार का दीप सिद्धू के साथ कोई संबंध नही है।
जय हिन्द— Sunny Deol (@iamsunnydeol) January 26, 2021
दिल्लीत झालेल्या शेतक-यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. यावेळी काही शेतक-यांनी लाल किल्ल्यावर निषेधाचे झेंडे फडकवले. त्याप्रसंगी दीप सिध्दु उपस्थित होते. त्यांनी त्या गोष्टीचे समर्थन केले. ते म्हणाले, शेतक-यांनी आपला राष्ट्रीय ध्वज हटवला नाही तर त्यांच्या एका संघटनेचा ध्वज त्याठिकाणी लावला. ते प्रतिकात्मक होते. जे काही चालले आहे त्याचा निषेध म्हणून त्यांनी अशाप्रकारची कृती करुन निशाण साहिब चा ध्वज लावला होता. तो ध्वज शीख धर्माचे प्रतिक आहे. आणि त्या झेंड्याला गुरुव्दारामध्येही लावले जाते असे सिध्दुनं सांगितले. यावर सनीनं व्टिट केले आहे. तो म्हणाला, आता माझे त्याच्याशी काही देणेघेणे नाही. मी किंवा माझे परिवारातील कोणी त्याला ओळखतही नाही. त्यानं जे काही केले किंवा त्या कृतीला समर्थन केले त्यावरुन वाईट वाटले. यापूर्वीही त्याच्याविषयी 6 डिसेंबरला व्टिट करुन माहिती दिली होती.
'शेतक-यांविषयी बोलली,घे मग; 6 जाहिरात कंपन्यांचा कंगणाला धडा'
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, सिध्दु ने फेसबूकवर पोस्ट केली होती. त्यात त्यानं असा दावा केला होता, मी उचलेलं पाऊल हे काही योजनाबध्द नव्हते. त्यामुळे त्याला कोणत्याही स्वरुपाचा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न कोणी करु नये. सध्या काही कट्टरपंथियांकडून त्याला वेगळे स्वरुप देण्यात येत आहे. ते चूकीचे आहे.