'शेतक-यांविषयी बोलली,घे मग; 6 जाहिरात कंपन्यांचा कंगणाला धडा' 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 27 January 2021

काल दिल्लीत शेतक-यांनी जे आंदोलन केले त्यावरही कंगणानं भाष्य केलं. ते तिला चांगलेच महागात पडले आहे.  

मुंबई - कंगणाला तिचं शेतक-यांविषयीचं बोलणं चांगलचं महागात पडले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगणानं आपल्या सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाविषयी टोकाची भूमिका घेतली होती. इतकेच नव्हे तर त्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतक-यांवरही तिनं टीका केली होती. यामुळे कंगणाला मोठ्या वादाला सामोरं जावं लागलं आहे. तिच्यावर कित्येकांनी आक्षेप घेतला आहे. बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी कंगणाला प्रत्युत्तर केलं आहे. प्रत्येक गोष्टीत मत व्यक्त करुन वातावरण दुषित करण्याचा तिचा प्रयत्न असल्याचे त्या सेलिब्रेटींनी म्हटले आहे.

काल दिल्लीत शेतक-यांनी जे आंदोलन केले त्यावरही कंगणानं भाष्य केलं. ते तिला चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळे सहा मोठ्या ब्रॅण्डने तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. त्यांनी यापुढील काळात तिच्याशी केलेला करार रद्द केला आहे. विशेष म्हणजे कंगणानेच त्याच्याबद्दलची  माहिती सोशल मीडियावर शेयर केली आहे. 26 जानेवारीला दिल्लीत प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्च केला. तेव्हा त्या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले.

यासगळ्या प्रकरणावर कंगणानं एक व्हिडीओ शेअर करत शेतकऱ्यांवर टीका केली होती. ती म्हणाली, स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे दहशतवादी आहेत, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना तुरुंगात टाका. अशाप्रकारची जहरी टीका तिनं यावेळी केली होती. यामुळे तिच्यावर नेटक-यांनी सुनावण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे त्या सहा  ब्रँण्डने तिच्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे.

अजब नाय गजब; 25 वर्षांपूर्वीच झाला मृत्यू, आता त्याच्याच आवाजात नवं गाणं

कंगणाने जे ट्विट केले आहे त्यात ती म्हणाली की, तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे आता आम्ही तुम्हाला बँण्ड अॅम्बेसेडर करु शकत नाही. पण, आता मी त्यांना सांगू इच्छित आहे की, जे आज झालल्या हिंसेला पाठिंबा देत आहेत, ते सुद्धा दहशतवादी आहेत”, असे उत्तर तिनं त्या कंपनीला दिले आहे. कंगणा सध्या तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. हे चित्रीकरण सुरु असताना भोपाळमध्ये तिला एका आंदोलनाचा सामना करावा लागला. चित्रीकरण सुरु असताना एका राजकीय गटाने कंगणाला विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली होती. या चित्रपटाचं चित्रिकरण भोपाळमध्ये होऊ नये, आणि तिनं भोपाळमधून निघून जावं अशी मागणी या आंदोलकांनी केली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress Kananga ranaut tweeted on the farmers strike Six brands cancelled contracts