बॉबी, ऐश्वर्याला कित्येक वर्षांपूर्वीच होती कोरोनाची माहिती; भन्नाट मीम्स व्हायरल 

actor bobby deol predict covid many years ago watch funny meme video sunny deol Aishwarya rai bachchan
actor bobby deol predict covid many years ago watch funny meme video sunny deol Aishwarya rai bachchan
Updated on

मुंबई - कोरोनाचा वाढता कहर सर्वांच्या काळजीचा आणि डोदेदुखीचा विषय ठरतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या संकंटांना सामोरं जावं लागतं आहे. दिवसेंदिवस वाढणारा कोरोना यामुळे पुढे काय होणार, कोरोना जाणार की आणखी त्रासदायक ठरणार असे प्रश्न नागरिकांना भेडसावू लागले आहेत. सध्या कोरोनानं बॉलीवूडमध्ये आपला प्रसार करायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन ते तीन आठवडयांपासून अनेक दिग्गज सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. ते आता क्वॉरंनटाईन आहेत. त्यांनी इतर सहकलाकारांनाही सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सध्या त्यावरुन एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

प्रसिध्द अभिनेता बॉबी देओल आणि ऐश्वर्या रॉय यांना आपल्याला कोरोना होणार याची काही वर्षांपूर्वीच कल्पना होती. असा आशयाचा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो युझर्सला मोठ्या प्रमाणावर आवडला असून वेगवेगळ्या माध्यमांतून व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. बॉबी देओलची बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरु झाली आहे. त्याच्या आश्रम नावाच्या वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेकांच्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असणारी ती मालिका होती. तिला वादाचा, टीकेचा सामना करावा लागला. त्याच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. मात्र त्या मालिकेनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

बॉबी आणि ऐश्वर्याच्या काही चित्रपटातील प्रसंग मोठ्या खुबीनं एडिट करण्यात आले असून त्याचा संबंध कोरोनाशी लावण्यात आला आहे. त्यामुळे तो व्हिडिओ मोठा गंमतीशीर झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये बॉबी देओल अशी कामं करतो आहे की ती कोरोनाच्या काळात केली जात आहेत. बॉबीचा तो अंदाज त्याच्या चाहत्यांना भलताच आवडला आहे. त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बॉबीचा हा गंमतीशीर व्हिडिओ त्याच्या फॅन अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यात बॉबी म्हणतो, मला तर आता स्पष्ट दिसते आहे, मात्र तुम्हाला दिसत नाही ते म्हणजे आपल्याला मोठ्या आजाराला सामोरं जावं लागणार आहे. एका प्रसंगात तो सनी देओलला म्हणतो, मला हात लावू नका. कदाचित तो आजार मलाही होईल.

बॉबीच्या त्या मीम्समध्ये ऐश्वर्याची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. तिच्या आणि बॉबीच्या एका चित्रपटातील हा सीन मीम्समध्ये घेण्यात आला असून त्याचा संबंध कोरोनाशी लावण्यात आला आहे. त्यावेळी बॉबी ऐश्वर्याला म्हणतो की, प्रेमानं नव्हे तर, जबरदस्तीनं का होईना तुला ही टेस्ट करावी लागेल. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की, दोघेजणं मास्क घातलेले आहेत. तर सीनमध्य़े असे दाखवण्यात आले आहे, बॉबी घरातील सर्व लॉक लावून घेतो. त्याचा संबंध लॉकडाऊन आणि क्वॉरंनटाईनशी लावण्यात आला आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com