esakal | टॉलीवूड सुपरस्टार चिरंजीवीकडून कोरोनाचं व्हॅक्सिन 'फ्री'

बोलून बातमी शोधा

actor chiranjeevi helping
टॉलीवूड सुपरस्टार चिरंजीवीकडून कोरोनाचं व्हॅक्सिन 'फ्री'
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - देशात कोरोना रूणसंख्या वाढत आहेत. सरकारने लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. 45 वर्षा पुढील सर्व व्यक्तींसाठी कोरोना लसीकरण सुरू झाले. सरकारी रूग्णालयात ही लस मोफत मिऴत आहे. पण खाजगी रूग्णालयात मात्र लसीकरणासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागत आहेत. प्रसिध्द अभिनेता चिरंजीवीने आता चित्रपट क्षेत्रात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरण मोफत देण्याची घोषणा केली आहे. चिरंजीवीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे या व्हिडीओमध्ये चिरंजीवीने सांगितले ‘ गुरूवार, 22 एप्रिलपासून 45 वर्षापुढील व्यक्तींना लसीकरण दिले जाईल.’ चिरंजीवी यांच्या ccc म्हणजेच कोरोना क्राइसिस चैरिटीमधून तो सिनेसृष्टीतील वर्कर्सना मोफत लस देणार आहे. तसेच मेडिकलच्या इतर वस्तू देखील संस्थे मार्फत कमी दरामध्ये मिळणार आहे.

चिरंजीवीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले की, ‘चित्रपटसृष्टीतील वर्कर्सच्या पत्नी देखील मोफत लस घेऊ शकतात. ही मोपत लसीकरण मोहिम एक महिना चालणार आहे. मनोरंजन क्षेत्राचे पत्रकार देखील ही मोपत लस घेऊ शकतात’. कोरोना महामारीच्या काळात अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देशील नागरिकांची मदत केली आहे. चिरंजीवीच्या कोरोना क्राइसिस चैरिटीसाठी राम चरण, जुनियर एनीटीआर, नागार्जुन, प्रभास या कालाकारांनी मागच्या वर्षी डोनोशन दिले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द कालाकार सोनू सुदने देखील लॉकडाउनमध्ये मजुरांना त्याच्या घऱी जाण्यासाठी मदत केली होती. तसेच सलमान खान , अमिताभ बच्चन, शाहरूख खान या कलाकरांनी देखील कोरोना रूग्णांना मदत केली.