'त्यांच्या घरात अनुभवली हजची यात्रा झाली' धरमपाजींची प्रतिक्रिया

त्यांनी आपला बॉलीवूडचा प्रवास सुरु झाल्यापासूनच्या कित्येक आठवणी यावेळी चाहत्यांना सांगितल्या आहेत.
dharmendra and dilip kumar
dharmendra and dilip kumar Team esakal
Updated on

प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे निधन झाले. दरम्यान बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनीही दिलीप कुमार यांच्याबद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी आपला बॉलीवूडचा प्रवास सुरु झाल्यापासूनच्या कित्येक आठवणी यावेळी चाहत्यांना सांगितल्या आहेत. दिलीप कुमार आपल्यासाठी देवासमान असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. (actor dharmendra grieves on dilip kumar demise legendary actors)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना धर्मेंद्र यांनी सांगितले की, जेव्हा मला दिलीप कुमार गेल्याचे कळले तेव्हा काही सुचेनासे झाले. मी निशब्द झालो. माझ्या पडत्या काळात मला आधार देण्याचे काम दिलीप कुमार यांनी केले. ते कायम माझ्यासाठी प्रेरणास्थान होते. त्यांनी मला खूप आत्मविश्वास दिला. जेव्हा मी दिलीप कुमार यांना पाहतो त्या त्या वेळी मला हजची यात्रा करुन आल्यासारखे वाटत असल्याची भावना धर्मेंद्र यांनी व्यक्त केली.

धर्मेद्र हे दिलीप कुमार यांना देव मानत होते. धर्मेंद्र यांना आपल्या करिअरमध्ये सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्तिमत्व दिलीप कुमार यांचे जाणवले. दिलीप यांना मनापासून मानणारे म्हणून बॉलीवूडमध्ये धर्मेंद्र यांची वेगळी ओळख आहे. त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत साथ पारी, अनोखा मिलन सारखे चित्रपट केले. आजही मी जेव्हा त्या फ्रेम्स पाहतो तेव्हा भावनाशील झाल्याशिवाय राहवत नाही. अनेक आठवणी आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आता आठवत असल्याचे धर्मेंद्र यांनी सांगितले.

dharmendra and dilip kumar
मोहम्मद युसूफ खानचा 'दिलीप कुमार' कसा झाला?

सायरा यांची अशाप्रसंगी भेट घ्यायची म्हणजे मोठं धाडस अंगी बाणवावं लागेल. मला तिच्या समोर जाता येणार नाही. तिला भेटायला जाणार आहे. मात्र जेव्हा तिला भेटेल तेव्हा तिच्याशी काय बोलावं हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. सायरा आणि दिलीप कुमार या दोघांनीही मला खूप आत्मविश्वास दिला. ताकद आणि प्रेरणा दिली. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. त्यांचे माझ्यावर अनेक उपकार आहेत. त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकता आल्या. ज्याचा मला माझ्या आयुष्यात उपयोग झाला. आजचा दिवस माझ्यासाठी वेदनादायी आहे. माझा देव गेला आहे, असं मला वाटत आहे. या शब्दांत धर्मेंद्र यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com