esakal | दोन दिवसांत अडीच कोटी व्ह्युज; इमरान हाश्मी बॅक, 'लुट गए' रिलीज
sakal

बोलून बातमी शोधा

actor emraan hashmi lut gaye full song released yukti thareja gets the first break

इमरान हाश्मीचे लुट गए या नावाचे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

दोन दिवसांत अडीच कोटी व्ह्युज; इमरान हाश्मी बॅक, 'लुट गए' रिलीज

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - इमरान हाश्मी त्याच्या किसिंग सीन बद्दल जास्त चर्चेत राहिलेला अभिनेता. पुढे तिच त्याची ओळख होऊन गेली. गेल्या काही महिन्यांपासून तो बॉलीवूडपासून लांब होता. त्याची कारणे वैयक्तिक असल्याचे त्याने एका पोस्टमधून सांगितले होते. आता इमरान पुन्हा परतला आहे. त्याचे एक नवीन गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे त्या गाण्याला दोन दिवसांत अडीच कोटी व्ह्युज मिळाले आहेत.

इमरान हाश्मीचे लुट गए या नावाचे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सध्या ते गाणं ट्रेडिंगचा विषय आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय़ झाला आहे. मोठ्या काळानंतर इमरान या पडद्यावर दिसला आहे. ते गाणं ब़ॉलीवूडचा प्रसिध्द गायक ज्युबिन नोटियालनं गायलं आहे. त्याचे संगीतही सर्वांच्या आवडीचा विषय आहे. त्या गाण्याची निर्मिती टी सीरिजनं केली आहे. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर एका तासाच्या आत ते प्रचंड व्हायरल झाले. तेव्हाच त्या गाण्याला 4 लाख 88 हजार 909 व्ह्युज मिळाले होते.

त्या गाण्यामध्य़े एक वेडिंग सेट अप दाखवण्यात आला आहे. गाण्यात दाखवण्यात आलेला लग्नाचा प्रसंग, त्यातील व्टि्स्ट, लग्न मोडून नवरीचे इमरान बरोबर पळून जाणे, मारामारी, यामुळे ते अनेकांच्या आवडीचे झाले आहे. गाण्यात इमरानच्या जोडीला मुख्य भूमिकेत युक्ति थरेजा आहे. युक्ति नवरीच्या वेशभुषेत सुंदर दिसते आहे. तिच्या मनाविरुध्द लग्न होत आहे. तर इमरान हा एका मिशनवर असल्याचे दाखवण्यात आले आहे. गाण्याच्या शेवटी काय होते. यामुळे त्याला जास्त युझर्स मिळाले आहेत. लग्नाच्या मंडपातून पळ काढून जेव्हा ती इमरान बरोबर जाते तेव्हा तिला समजते की तो पोलीस आहे. एका रात्रीची गोष्ट या गाण्यात दाखविण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. इमरानचा चाहतावर्ग मोठा आहे. त्या गाण्याच्या प्रदर्शनापूर्वी त्याचे काही पोस्टरही समोर आले होते. त्याच्या चाहत्यांना या गाण्याची उत्सुकता होती.