चाहत्याने मराठी असून मराठीत का बोलत नाहीस? विचारल्यावर 'या' अभिनेत्याचा चढला पारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

गश्मिर महाजनीने नुकतंच एक वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. पण त्याचबरोबरीने त्याने नेटकऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.

मुंबई- कलाविश्वातील कलाकार मंडळी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर कोणते नवे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलेलं असतं. बरं कलाकारांना नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. असंच काहीसं आता अभिनेता गश्मिर महाजनीच्याबाबतीत घडलं आहे. गश्मिर सध्या त्याला मिळालेल्या सुट्टीमध्ये कुंटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. शिवाय वर्कआऊटमध्ये अधिकाधिक वेळ घालवत आहे. 

हे ही वाचा: क्रिती सॅनने बनवलेले पुडिंग पाहुन कार्तिकने उडवली खिल्ली

गश्मिरने नुकतंच एक वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. पण त्याचबरोबरीने त्याने नेटकऱ्यांना खडेबोल सुनावले आहे. वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर करत 'मराठी माणुस आहेस तर मराठीत का बोलत नाहीस अशी कोणी कमेंट केली तर मी त्याला ब्लॉक करुन टाकीन...माझं मराठीपण सिद्ध करायला प्रत्येकवेळी मला मराठीतंच बोलायची गरज नाही.' असे म्हटले आहे. त्याची ही पोस्ट पाहून गश्मिरचा पारा चांगलाच चढला असल्याचंच दिसतंय. 

फक्त मराठीत बोललं पाहिजे अशी कमेंट करणाऱ्यांना गश्मिरने इशारा दिला आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, घरीच राहा, सुरक्षित राहा असेही आवाहन त्याने चाहत्यांना केले आहे. गश्मिर सतत त्याच्या सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचे फोटो व्हिडिओ शेअर करत असतो. त्याशिवाय त्याच्या ग्लॅमरस फोटोलाही हजारो लाईक्स असतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Making the most of my time at hand... stay home. stay safe. self quarantine.

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

गश्मिरने आतापर्यंत वन वे तिकिट, कॅरी ऑन मराठा, देऊळ बंद, कान्हा, मला काहीच प्रॉब्लेम नाही यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही हिंदी चित्रपटांमध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. बहुचर्चित पानीपत चित्रपटामधील त्याची भूमिका विशेष गाजली. शिवाय अभिनेत्री पुजा सावंतबरोबरचा त्याचा बोनस चित्रपटही एक वेगळ्याच पठडीतला चित्रपट होता.

actor gashmir mahajani got angry when his fan ask him to speak in marathi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor gashmir mahajani got angry when his fan ask him to speak in marathi