
लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी भाजी विकत असल्याच्या अफवा सोशल मिडियावर पसरत होत्या. मात्र या व्हायरल व्हिडिओवर आता अभिनेता जावेद हैदरने स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई- आमीर खानच्या सहकलाकाराचा भाजी विकतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी भाजी विकत असल्याच्या अफवा सोशल मिडियावर पसरत होत्या. मात्र या व्हायरल व्हिडिओवर आता अभिनेता जावेद हैदरने स्पष्टीकरण दिलं आहे.
हे ही वाचा: 'या' व्यक्तीला भेटण्यासाठी अनुपम खेर यांनी तोडले होते बॅरिकेड्स
आमीर खानच्या गुलाम सिनेमात सहकलाकार म्हणून काम केलेल्या तसंच दबंग ३ आणि इतर सिनेमांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारलेल्या अभिनेता जावेद हैदरचा भाजी विकतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. याची सुरुवात झाली ती बिग बॉस फेम डॉली बिंद्राने केलेल्या ट्विटमुळे. डॉली बिंद्राने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, 'हा एक अभिनेता आहे जावेद हैदर, लॉकडाऊनमुळे त्याच्यावर भाजी विकण्याची वेळ आली आहे.'
He is an actor aaj woh sabzi bech raha hain javed hyder pic.twitter.com/4Hk0ICr7Md
— Dolly Bindra (@DollyBindra) June 24, 2020
मात्र व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर आता जावेदने स्पष्टीकरण देत या अफवा असल्याचं सांगितलं आहे. मी आर्थिक परिस्थितीमुळे नाही तर मनोरंजासाठी भाजी विकत असल्याचं त्याने स्पष्ट केलंय.
एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटलंय, 'मी भाजी विकत नाहीये. लॉकडाऊनमध्ये स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवण्यासाठी मी काही व्हिडिओ शूट केले होते. माझ्या मुलीने त्यासाठी मला प्रोत्साहित केलं होतं. लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर आर्थिक उत्पन्नाचा प्रश्न उभा राहिला आहे. काहीजण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. तेव्हा या परिस्थितीत थोडफार का होईला लोकांचं मनोरंजन करता यावं यासाठी मी तो व्हिडिओ शूट केला होता. भाजीविक्रेत्याच्या परवानगीने मी त्याची गाडी घेऊन हा छोटा व्हिडिओ शूट केला. आणि तो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
सध्या अनेकांसमोर आर्थिक संकट आहे मान्य आहे परंतु मला अजुनतरी पैशाची चणचण भासलेली नाही. जमा केलेले पैसे लॉकडाऊन दरम्यान कामी येत आहेत' असं त्याने या मुलाखतीत सांगितलं.
actor javed hyder clarifies not selling vegetables for a living