'या' व्यक्तीला भेटण्यासाठी अनुपम खेर यांनी तोडले होते बॅरिकेड्स

टीम ई सकाळ
मंगळवार, 30 जून 2020

स्वतः एक स्टार असून इतकंच नाही तर कित्येक विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देणारे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या आवडत्या स्टारला भेटण्यासाठी बॅरिकेड्स तोडले होते. कोण होता हा स्टार? वाचा..

मुंबई- चाहते त्यांच्या आवडत्या स्टारला भेटण्यासाठी हरत-हेचे प्रयत्न करताना तुम्हा आजवर पाहिले असतील. मात्र तुम्ही एखादा स्टार त्याच्या आवडत्या स्टारला भेटण्याासाठी बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत पोहोचलेला ऐकलं आहे का? होय. बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी असं केलंय. त्यांनी स्वतः याबाबतचा खुलासा केला आहे. स्वतः एक स्टार असून इतकंच नाही तर कित्येक विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देणारे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या आवडत्या स्टारला भेटण्यासाठी बॅरिकेड्स तोडले होते. कोण होता हा स्टार? वाचा..

हे ही वाचा: अभिनेता कुणाल खेमु भडकला, म्हणाला 'सामना करण्यासाठी मैदान एकसारखं तर द्या'

अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरुन याविषयी माहिती दिली आहे. अनुपम खेर यांनी प्रसिद्ध पॉप स्टार माइकल जॅक्सनला भेटण्यासाठी बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत पोहोचले होते. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा माइकल जॅक्सन भारत दौ-यावर होता. अनुपम खेर यांनी त्या क्षणाचे दोन फोटो शेअर केले आहेत. इतकंच नाही तर त्यावेळी नेमकं काय घडलं होते ती घटना देखील सांगितली आहे. 

अनुपम यांनी लिहिलंय, 'या फोटोची कहाणी- जेव्हा माइकल जॅक्सन १९९६ मध्ये भारतात आला होता तेव्हा काही मर्यादित लोकांना त्याला भेटण्याासाठी ऑबेरॉय हॉटेल गार्डनमध्ये बोलवण्यात आलं होतं. मी पण त्यापैकी एक होतो यासाठी भरत भाई यांना धन्यवाद. गार्डनमध्ये छोटासा स्टेज सेटअप होता जिथे पाहुण्यांसाठी एक बॅरिकेड लावलं होतं. माइकल जॅक्सन हॉटेलच्या रुममधून आला आणि त्याच्या बॉडीगार्डसोबत स्टेजवर उभा राहिला. तिथे खूप शांतता होती.'

अनुपम यांनी पुढे असं लिहिलं की, 'मी त्यांच्याकडे केवळ बघत होतो ज्यांनी आपल्या जादुई परफॉर्मन्सने संपूर्ण जगाला मोहित केलं होतं. ते केवळ काही फूट माझ्यापासून लांब होते आणि मला ही संधी सोडायची नव्हती. म्हणून मी बॅरिकेड्स तोडले आणि स्टेजवर चढुन मायकल जॅक्सन यांना मिठी मारली. त्यांचे बॉडिगार्ड्स माझ्याकडे धावतील आणि मला बाजुला करतील तोपर्यंत भरत भाई शाह यांनी तिथे येऊन हे सांगून माझी त्यांच्याशी भेट घालून दिली की हे भारतातील खूप मोठे अभिनेते आहेत. हे ऐकून माइकल जॅक्सन विनम्रतेने आणि आनंदाने माझ्याशी हात मिळवला आणि मी या क्षणी कॅमेरात कैद झालो.'  

anupam kher once broke barricades jumped on the stage and hugged michael jackson  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anupam kher once broke barricades jumped on the stage and hugged michael jackson