सलमान जिंकणार की जॉन; ईदच्या दिवशी होणार टक्कर

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 January 2021

यापूर्वीही अक्षय जॉन यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. जॉनचा सत्यमेव जयते आणि अक्षयचा रुस्तूम चित्रपट यांची टक्कर झाली होती.

मुंबई- एका बाजूला बॉलीवूडचा भाईजान सलमान खान दुसरीकडे आपल्या जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखला जाणारा हिरो म्हणून जॉनचे नाव घ्यावे लागेल. अशा दोन्ही कलाकारांचे चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहे. दोघांचाही फॅन्स फॉलोअर्स मोठा आहे. तुलनेनं सलमानचा अधिक आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे अभिनेते आहेत. त्यांचा प्रदर्शित होणारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणारा आहे. मात्र चालू वर्षी एकाच दिवशी या दोघांचेही चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं कोण जिंकणार याची उत्सुकता वाढली आहे.

जॉनचा सत्यमेव जयते चा दुसरा भाग हा सलमानच्या राधे द मोस्ट वॉटेड भाई चित्रपटाला टक्कर देण्यासाठी प्रदर्शित होणार आहे. राधे ही एक अॅक्शन फिल्म आहे. प्रभुदेवानं त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. हे दोन्ही चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. जॉननं आता सत्यमेव जयते 2 च्या प्रदर्शनाची तारीख ईदच्या दिवशीची आहे. या वर्षीचे बिग बजेट चित्रपट म्हणून या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. भाईजानचा चालू वर्षातला पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानेही यापूर्वी तारखेविषयी सोशल मीडियावर एक पत्रक प्रसिध्द केले होते.

जॉननं त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर फोटो शेयर केला आहे त्यात तो हातात तिरंगा घेऊन फडकवताना दिसतो आहे. त्यानं असे लिहिले आहे की, तन मन आणि धनपेक्षा सर्वात मोठं अस जन गण मन, जय हो सत्यमेव जयते 2 टीमला गणतंत्राच्या मनपूर्वक शुभेच्छा. आता आपली भेट 14 मे 2021 मध्ये होणार असल्याचे त्याने सांगितले आहे. जॉनच्या सत्यमेव जयतेचे दिग्दर्शन मिलाप जवेरीनं केले आहे. ही एक अॅक्शन मुव्ही आहे. त्यात जॉन हा विरेंद्र राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत आहे. सत्यमेव जयतेच्या सिक्वेलमध्ये मनोज वाजपेयीही दिसणार आहेत. 

'BSF मधली नोकरी सोडली, महाभारतात केली भीमाची भूमिका'

सलमानचा राधे मोस्ट वॉंटेड भाई हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यात सलमानच्या जोडीला दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा हे महत्वाच्या भूमिकेत आहेत. राधे ही मागच्या वर्षी प्रदर्शित होणार होती. मात्र कोरोनामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. यापूर्वीही अक्षय जॉन यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. जॉनचा सत्यमेव जयते आणि अक्षयचा रुस्तूम चित्रपट यांची टक्कर झाली होती. या दोन्ही चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor john Abraham vs Salman khan clash on Eid 2021 satiate jayate 2 and radhe the most wanted bhai release on 14th may