
Ek Villain Returns: नव्या रिलीज डेटची घोषणा, जॉन इब्राहिमने शेअर केले पोस्टर
'एक विलनची' लव स्टोरी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेच.या चित्रपटाचा दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते.एक विलन रिटर्नची रिलीज डेट ८ जुलै निश्चित झाली होती.या दिवशी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.मात्र काही कारणांनी या चित्रपटाची रिलीज डेट बदलून आता नवी डेट पुढे आली आहे.
अभिनेता जॉन इब्राहिम या चित्रपटात दिसणार आहे.चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटची माहिती त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे.जॉनने त्याच्या इन्स्टा अकऊंटला एक लाल कलरच्या बॅकग्राउंडला एक भयानक स्माईली असलेला फोटो पोस्ट केलाय.या चित्रपटाचा पहिला भाग २०१४ मधे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.(bollywood Movie)ज्याचे निर्देशन मोहित सुरीने केले आहे.याआधीच्या भागात रितेश देशमुख, सिद्धार्थ आणि श्रद्धा कपूर या कलाकारांनी काम केले होते.त्यांच्या त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ही चांगलं होतं.
यावेळी चित्रपटाच्या दुसऱ्या भागात जॉन इब्राहिमच्या लीड रोलसोबत अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा दिसणार आहेत.याआधी एक विलन रिटर्नची रिलीज डेट ८ जुलै होती.मात्र जॉनने आता या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटची तारीख सांगितली आहे.२९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती त्याने दिली आहे.आता हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो ते चित्रपटाच्या रिलीज डेट नंतरच प्रेक्षकांना कळेल.मोहित सूरीने हाफ गर्लफ्रेंड,आशिकी २,मर्डर अश्या अनेक चित्रपटांचे निर्देशन केले आहे.जॉन इब्राहिम मोहितसोबत पहिल्यांदाच त्याच्या चित्रपटात काम करणार आहे.
Web Title: Actor John Shared A Post With New Release Date Of Ak Villain On Instagram
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..