कंगना म्हणते,'सहा बोटांच्या माणसांनी माझा धसका घेतलाय';ऐकून नेटकरी भडकलेKangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

कंगना म्हणते,'सहा बोटांच्या माणसांनी माझा धसका घेतलाय';ऐकून नेटकरी भडकले

कंगना रनौत(Kangana Ranaut)च्या 'लॉकअप' रिअॅलिटी शो च्या प्रोमोतला एक छोटासा तुकडा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यात कंगना नं बोलता बोलता पुन्हा हृतिकवर आपला निशाणा साधला आहे. खरंतर ती छोटीशी क्लिप आहे 'लॉकअप' शो च्या प्रीमियरच्या वेळची. हा शो कंगना होस्ट करतेय. आता हळूहळू 'लॉकअप' मधले वाद चव्हाट्यावर येऊ लागलेयत. अन् नको नको त्या गोष्टी टलॉकअपट मधील सदस्यांच्या बाबतीत कानावर पडू लागल्यात. त्यामुळे शो आता आपले रंग दाखवू लागला आहे असं म्हणायला हरकत नाही.

या व्हायरल क्लीपमध्ये नेहमीप्रमाणे स्वतःच्या प्रेमात आकंठ बुडालेली कंगना इतरांवर ताशेरे ओढताना दिसत आहे. आपण शो करत असल्यामुळे कसे आपले विरोधक आपले प्रशंसक बनले आहेत,आपल्या गिफ्ट्स पाठवत शुभेच्छा संदेश देतायत वगैरे वगैरे प्रवचन तिचं सुरू आहे. पण इतक्यात ती मध्ये म्हणते कशी,''सहा बोटांच्या लोकांचा गळा माझ्या भीतीनं सुकला आहे. त्यांना भीती वाटतेय की मी या मंचावर त्यांच्याविषयी काही उलट-सुलट बोलणार तर नाही. त्यांची पोल खोल तर करणार नाही''.

हेही वाचा: The Kashmir Files:सिनेमा पाहून प्रेक्षक रडतायत,एका महिलेनं तर चक्क...

आता यातनं स्पष्ट होतंय की कंगनाचा इशारा हृतिक(Hrithik roshan)कडे आहे. कारण कधीतरी म्हणे ती आणि हृतिक रिलेशनशीपमध्ये होते. पण त्यांच बिनसलं,ते वेगळे झाले अन् मग कंगनानं हृतिकला शेकडो हिंसक भाषा वापरलेले मेल कले असा आरोप हृतिकने तिच्यावर करीत केसही केली होती. पण ते आपण पाठवले नसून कोणीतरी आपल्या मेल आयडीचा गैरवापर केल्याचं सांगत कंगनानं हृतिकचा आरोप फेटाळून लावला होता. कंगनानं आपण हृतिकला २०१६-१७ दरम्यान डेट करत होतो हे अनेकदा सांगितले आहे पण हृतिकने मात्र याला साफ इन्कार केला होता,करतोय.

हेही वाचा: बांग्लादेशमध्ये सनी लिओनीवर बंदी; म्हणाले,'आमच्या भूमीत दिसली तर...'

कंगनाच्या या क्लीपवर इंटरनेट मात्र पिसाळलं आहे. कंगनाच्या विरोधातच अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. शेवटी बेताल बोलणाऱ्या कंगनाचा स्वभाव एव्हाना अनेकांना पटेनासा झालाय याचच हे चित्र. कुणी तिला 'चालाख' म्हटलंय तर कुणी म्हटलंय,'हृतिकसोबत आपलं नातं होतं हे उगाच का पटवून देण्याचा प्रयत्न करतेय,संधीसादू'. तर कुणी म्हटलंय,'मोस्ट टॉक्सिक एक्स....'अशा विविध प्रतिक्रिया आहेत. कंगनाची ती क्लिप बातमीत जोडली आहे. तिथे या प्रतिक्रियाही वाचता येतील.

Web Title: Actor Kangana Ranauts Sly Dig At Hrithik Roshan Has Not Been Ignored By The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top