कपिल शर्माने मागितली मोदींची माफी

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 जानेवारी 2019

अभिनेता कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे. 9 सप्टेंबर 2016 मध्ये कपिलने 'यह है आपके अच्छे दिन' असे म्हणत ट्विट केले होते.

मुंबई : अभिनेता कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे. 9 सप्टेंबर 2016 मध्ये कपिलने 'यह है आपके अच्छे दिन' असे म्हणत ट्विट केले होते. काही दिवसांपूर्वी मोदी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या उद्धाटनासाठी आले होते, त्यावेळी मोदींची व कपिलची भेट झाली होती. 

'मी महनगरपालिकेचा मागील 5 वर्षात 15 कोटीचा कर भरला आहे. तरीही मी पुन्हा मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना माझ्या ऑफिससाठी 5 लाखाची लाच दिली.' असेही ट्विट कपिलने केले होते आणि हेच का तुमचे 'अच्छे दिन' असा सवाल केला होता. 

 

नुकत्याच झालेल्या मोदी व अभिनेता राजकुमार राव यांच्या भेटीत, मोदींनी राजकुमार रावला कपिलला त्याच्या लग्नाच्या शुभेच्छा पोहोचवण्याचा निरोप दिला होता, यावेळी मोदींच्या चेहऱ्यावर राग दिसत होता, असे राजकुमार रावने कपिलच्या शोमध्ये सांगितले. त्यानंतर कपिलने मोदींची जाहीर कार्यक्रमात माफी मागितली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Kapil Sharma apologized PM Narendra Modi for his tweet