'आम्हाला पाहुणचारासाठी जग ओळखते.तुम्ही चोर म्हणून दाखवले'

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 24 November 2020

मनिषच्या त्य़ा जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी नेटक-यांकडून केली जात आहे.  तीन दिवसांपूर्वी मनीष पॉलने ट्विटरवर जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता.

मुंबई - अभिनेता मनिष पॉल सध्या भलत्याच चर्चेत आला आहे. त्याच्या जाहिरातीतून काश्मिरवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियामधून त्या जाहिरातीवर टीका करण्यात आली आहे. यापूर्वी देखील तनिष्कच्या जाहिरातीवरून सर्वसामान्य व्यक्तींच्या भावना दुखावल्या गेल्याचे दिसून आले होते. त्या जाहिरातीतून लव जिहादचा प्रचार प्रसार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

मनिषच्या त्य़ा जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी नेटक-यांकडून केली जात आहे. तीन दिवसांपूर्वी मनीष पॉलने ट्विटरवर जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्या त्या डॉलर या होजरी ब्रॅण्डच्या नवीन जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. टीव्ही होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलवर चित्रित झालेल्या या जाहिरातीवर काश्मिरींची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोशल मीडिया यूजर्स मनीष आणि कंपनी या दोघांना विरोध करत असून ही जाहिरात हटवण्याची मागणी करत आहेत. तीन दिवसांपूर्वी मनीष पॉलने ट्विटरवर जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता.या जाहिरातीच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे, "नोनू चिडिया दिग्दर्शित डालर थर्मलची ही नवी जाहिरात तुमच्यासोबत शेअर करताना आनंद होत असून डॉलर अल्ट्रा आहे तर काहीही एक्स्ट्रा नको.' त्यावर टीका करताना एका यूजरने लिहिले की, "मनीष पॉल हे अपमानास्पद आहे. प्रत्यक्षात ही जाहिरात काश्मिरींच्या विरोधात आहे.

 

आम्ही आमच्या पाहुणचारासाठी जगभर ओळखले जातो. मात्र तुम्ही आम्हाला चोर म्हणून या जाहिरातीच्या माध्यमातून दाखवले आहे. ती जाहिरात तात्काळ हटविण्यात यावी अशी आमची मागणी आहे.पॉलच्या त्या जाहिरातीमध्ये  तो आपल्या जोडीदाराबरोबर सेल्फी घेत असताना तेथे एक चोर येतो आणि त्याचे जॅकेट ओढून तेथून पळ काढतो. मनीष त्याचा पाठलाग करतो आणि मग ते दोघे एका तलावाच्या काठावर जाऊन थांबतात. यानंतर मनीष आणि त्याची जोडीदार त्यांचे सर्व कपडे चोराला देतात आणि म्हणतात, डॉलर अल्ट्रा आहे... तर मग आणखी काही नको.

हे ही वाचा: सिनेनिर्माती निधी हिरानंदानीने दान केलं चक्क ४२ लीटर ब्रेस्टमिल्क   

मनीष पॉल आणि डॉलर बिग बॉस हे काढून टाका. किंवा काश्मिरला कधीही येऊ नका. काश्मीर पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित स्थान आहे. तुम्ही काश्मिरींना चोर दाखवून त्यांचा अपमान करत आहात. आम्ही हे स्वीकारू शकत नसल्याचे एका नेटक-यानं म्हटलं आहे. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor manish paull trolled by social media related his dollar advertisement