अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांची भेट

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 29 जून 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या कुटुंबीयांची अभिनेते नाना पाटेकर यांनी आज भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

मुंबई ः अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या कुटुंबीयांची अभिनेते नाना पाटेकर यांनी आज भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
सुशांतच्या कुटुंबीयांशी बोलताना नाना पाटेकर भावूक झाले. “सुशांतचं जाणं हा आमच्या सगळ्यांसाठी मोठा धक्का होता. तो अतिशय गुणी व उत्तम अभिनेता होता. हा धीर व संयमाचा काळ आहे. सुशांतला नक्कीच न्याय मिळेल,” अशा शब्दात नाना पाटेकर यांनी सुशांतच्या वडिलांना धीर दिला.

प्लाझ्मा थेरेपी ठरतेय गुणकारी; नायर रुग्णालयातून तब्बल 'इतके' रुग्ण कोरोनामुक्त...

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या मृत्यूवरून वेगवेगळे आरोपही करण्यात आले. सध्या मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.

पुनःश्च हरिओम.. मुंबईकरांनो, दोन किलोमीटरपुढे जाऊ नका; वाचा कोणी केलंय आवाहन

पटना येथे सीआरपीएफ जवानांच्या प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पाटेकर यांनी जवानांशी संवादही साधला. त्यानंतर ते सुशांत सिंह राजपूतच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी सुशांतच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Nana Patekar visited the family of Sushant Singh Rajput