esakal | खान अभिनेते कुठल्याच मुद्द्यावर बोलणार नाहीत, नसरुद्दीन शहा भडकले
sakal

बोलून बातमी शोधा

naseeruddin-shah

खान अभिनेते कुठल्याच मुद्द्यावर बोलणार नाहीत, नसीरुद्दीन शहा भडकले

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपण जे काही बोलू त्यावर आपल्याला लोकांना काही म्हटले तरी चालेल पण जे खरं आहे ते बोलण्याची धमक असणारे मोजकेच सेलिब्रेटी आहेत. त्यात प्रख्यात अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्या नावाचा समावेश करावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून ते भलतेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी तालिबानी आणि हिंदूत्ववाद्याची केलेली तुलना, याशिवाय विनाकारण तालिबान्याचं समर्थन कशासाठी करता यासारख्या मुद्दयांना सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आताही ते अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी बॉलीवूडच्या तीन दिग्गज खान मंडळींवर सडकून टीका केली आहे. ती टीका सोशल मीडियावर वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे.

जेव्हा एखादा सामाजिक, धार्मिक, राजकीय मुद्दा येतो तेव्हा शाहरुख, सलमान आणि आमिर खान हे तिन्ही खान मंडळी कुठलीच भूमिका घेत नाही. या शब्दांत नसीरुद्दीन शहा यांनी टीका केली आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला खान अभिनेत्यांच्या चाहत्यांनी नसीरुद्दीन शहा यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ज्यावेळी त्या तीन मुद्द्यांवर ठाम भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा ते तीन खान काही बोलायला मागत नाही. हे तिघेजण अजूनही बॉलीवूडवर राज्य करतात त्याबद्दल दुमत नाही. मात्र जेव्हा भारत आणि विदेशांमधील धार्मिक बाबीं, त्यातील भेदभाव यावर व्यक्त होण्याची वेळ येते तेव्हा ते मागे सरकतात. असे दिसून आले. या शब्दांत नसरुद्दीन शहा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी नसीरुद्दीन शहा यांनी एनडीटीव्हीशी बातचीत करताना सांगितलं होतं की, तालिबान्यांचे आपण विनाकारण समर्थन करतो आहोत. मात्र तेथील लोकं आहेत त्यांच्याप्रती माणूसकीच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. त्यांच्याकडे गमावण्यासारखे खूप काही आहे. आपलं त्याकडे लक्ष नाही. केवळ अराजकतेकडे झुकणाऱ्या प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्यात आपण वेळ वाया घालवू नये. असे आपले मत आहे. ही भूमिका नसीरुद्दीन शहा यांनी घेतली होती.

नसीरुद्दीन शहा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भारतातील मुस्लिम हा पूर्णपणे वेगळा आहे. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. सध्या सगळ्या जगाला अफगाणिस्तानविषयी सहानुभूती आहे. मात्र काही भारतीय मुस्लिम हे त्या तालिबान्यांचे समर्थन करताना दिसत आहे. हे चूकीचं आहे. मला त्यांना विचारायचं आहे की, त्यांना आधुनिक काळाशी सुसंगत असं मुस्लिम तत्वज्ञान हवं आहे की, अराजकीय स्वरुपात सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्याला बेचिराख करुन टाकणारे विचार हवे आहेत. याचा बारकाईनं विचार करण्याची गरज आहे.

loading image
go to top