मंटोच्या रोलसाठी घेतलं होतं एक रुपया मानधन कारण...

युगंधर ताजणे
Monday, 18 January 2021

2018 मध्ये मंटो यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.  

मुंबई - बायोपिक करताना काही भूमिका अशा असतात की ज्या करण्यासाठी कलाकार आतूर असतात. ती भूमिका वठविण्यासाठी वाट्टेल तितके कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. प्रख्यात उर्दू साहित्यिक सदाअत हसन मंटो हे त्यांच्या वादग्रस्त लेखनासाठी प्रसिध्द होते. त्यांच्या काही कथांवर त्यावेळी खटलेही दाखल करण्यात आले होते. लेखनामुळे कायम वादाच्या भोव-यात सापडलेल्या मंटो यांना अखेरपर्यंत संघर्ष करावा लागला. त्यांच्यावर आलेल्या चित्रपटानं जाणकार प्रेक्षक, समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यात मंटो यांची भूमिका प्रख्यात कलाकार नवाजुद्दीन सिध्दिकी याने केली होती. त्याच्या त्या भूमिकाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट जगातल्या काही प्रमुख चित्रपट महोत्सवांमध्ये दाखविण्यात आला होता. ही भूमिका करताना आपल्याला आलेल्या अनुभवांविषयी नवाजुद्दीनं सांगितले आहे. तो म्हणाला ज्यावेळी ही मंटो यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार केला जाणार आहे असे कळले तेव्हा मला खूप आनंद झाला. त्यांच्या साहित्याचा मी पूर्वीपासून चाहता आहे. त्यांच्या कथा मला फार आवडतात. त्यांनी साहित्यातून केलेले सामाजिक परिवर्तन मोठे काम होते. एकूण त्यांचे व्यक्तिमत्व भावले.

प्रत्यक्षात चित्रिकरण सुरु झाले त्यावेळी मी एक ठरवले ते म्हणजे या चित्रपटासाठी एक रुपया मानधन घ्यायचे. हा मी विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. मंटो साकारताना त्यांचे सगळे साहित्य वाचून काढले. तयारी केली. केवळ त्यांच्या सारखे दिसणे म्हणजे मंटो होणे असे नाही तर त्यांनी साहित्यातून समाजातील पुरुषीपणावर केलेले जे प्रहार होते ते भूमिकेतून दाखवणे जास्त महत्वाचे होते. त्यामुळे ती भूमिका करण्याचे आव्हान मी पेलेले. प्रेक्षकांना ती भूमिका फार आवडली. हे मी माझे मोठे यश समजतो. मंटो यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं नवाजुद्दीननं काही आठवणींना उजाळा दिला आहे. 

बंडल 'तांडव', कथेवर नव्हे अभिनयावर तरलेला सत्तेचा 'नाटकी' पट

2018 मध्ये मंटो यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. स्क्रीनटेस्टच्या वेळी ही भूमिका आपल्याला पेलवणार की नाही याचा अंदाज आला होता. मात्र दिग्दर्शक नंदिता दास यांना नवाजुद्दीनवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला. केवळ देशातून नव्हे तर जगभरातील अनेक प्रेक्षकांनी नवाजुद्दीनचं कौतूक केले. ज्यावेळी नंदिता यांनी या चित्रपटाची पटकथा वाचायला दिली तेव्हा नवाजुद्दीन यांना चित्रपटातून मांडण्यात आलेले विचार हे आपलेच असल्याची जाणीव झाली. त्यामुळे काही करुन आपल्याला हा चित्रपट करायचा हे नवाजुद्दीननं ठरवलं.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor Nawazuddin Siddiqui takes 1 rupee fees for Manto movie