esakal | 'स्टारकिडसारखी मुलाची बॉलीवूड इंट्री नाही' परेश रावलं असं का म्हणाले?
sakal

बोलून बातमी शोधा

paresh and aditya rawal

'स्टारकिडसारखी मुलाची बॉलीवूड इंट्री नाही' परेश रावलं असं का म्हणाले?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) नेहमीच आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे अभिनेते म्हणून परेश रावल (paresh rawal) यांचे नाव घ्यावे लागेल. प्रस्थापित कलाकारांना छेद देऊन वेगळी ओळख निर्माण करण्यात परेश रावल यांना यश आले आहे. कॉमेडी सारख्या प्रकारात त्यांनी लीलया मुशाफिरी तर केलीच याशिवाय काही गंभीर विषयांवरील चित्रपटात त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. राजकारण आणि समाजकारणातही ते सक्रिय असतात. अशा परेश रावल यांची एक प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे. (actor paresh rawal reveals he couldnt launch son aditya because he explain the reason post viral yst88)

परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल (aditya rawal) हा सध्या बॉलीवूडमध्ये येण्याच्या तयारीत आहे. त्याविषयी परेश रावल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ते सोशल मीडियावर चर्चेत आहे. इतर स्टारकिडप्रमाणे आपण त्याला लाँच करणार नाही. असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये सेलिब्रेटींनी आपल्या मुलांसाठी वेगळ्या प्रकारचे लाँचिंग सुरु केले आहे. त्यात अभिनेते आणि अभिनेत्री यांचा समावेश आहे. परेश यांना याप्रकाराचा तिटकारा आहे. त्यांचे म्हणणे आहे की, माझ्याकडे मुलाला लाँच करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत.

एका मुलाखतीमध्ये परेश यांनी परखडपणे आपले विचार व्यक्त केले आहे. मला आदित्यला पैसे खर्च करुन लाँच करायचे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसाही नाही. आदित्यनं बमफाड (bumpfad) नावाच्या चित्रपटापासून आपला अॅक्टिंग डेब्यु केला होता. मात्र इतर सेलिब्रेटींच्या मुलांच्या तुलनेत आदित्यचा डेब्यु हा मोठा नव्हता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना माहिती पडले होते की, तो परेश रावल यांचा मुलगा आहे म्हणून.

हेही वाचा: "चांगल्या भूमिका फक्त बिग बींनाच मिळतात"; शरत सक्सेना यांची खंत

हेही वाचा: अनुष्काची वामिका ते करीनाचा जे; स्टारकिड्सच्या जन्मानंतरचे पहिले फोटो

मला माझ्या मुलाला लाँच करायचे आहे. मात्र तेवढ्या प्रमाणात माझ्याकडे पैसे नाहीत. पण मला त्यासाठी आवश्यक ती साधनं हवी आहेत. जेणेकरुन मी त्याला बॉलीवूडमध्ये घेऊन येईल. आनंद आणि समाधानाची बाब म्हणजे त्याच्या कामाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे मला त्याची फारशी चिंता नाही. त्याला त्याच्या मेहनतीमुळे नोटीस केलं जात आहे. याचे मला समाधान वाटते. बमफाडमध्ये त्यानं केलेलं काम प्रेक्षकांना आवडलं आहे.

loading image