esakal | "चांगल्या भूमिका फक्त बिग बींनाच मिळतात"; शरत सक्सेना यांची खंत
sakal

बोलून बातमी शोधा

sharat saxena, big b

"चांगल्या भूमिका फक्त बिग बींनाच मिळतात"; शरत सक्सेना यांची खंत

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'मिस्टर इंडिया', 'बागबान', 'क्रिश' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारे अभिनेते शरत सक्सेना Sharat Saxena यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत खंत व्यक्त केली आहे. 'बॉलिवूड ही फक्त तरुणांची इंडस्ट्री आहे. ज्येष्ठ कलाकारांसाठी ज्या काही चांगल्या भूमिका असतात, त्या फक्त अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांनाच मिळतात आणि माझ्यासारख्यांना उरलेल्या भूमिका मिळतात', असं ते म्हणाले. शरत यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'शेरनी' Sherni या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटानिमित्त दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडविषयी खंत बोलून दाखवली. (Sharat Saxena says all good roles written for old people go to Amitabh Bachchan slv92)

'रेडिफ'ला दिलेल्या मुलाखतीत शरत म्हणाले, "फिल्म इंडस्ट्री ही फक्त तरुणांची इंडस्ट्री आहे. इथे ज्येष्ठ कलाकारांची गरज नाही. दुर्दैवाने, आम्ही अजूनही जिवंत आहोत आणि आम्हाला अजूनही काम करण्याची इच्छा आहे. या इंडस्ट्रीमध्ये ज्येष्ठांसाठी किती भूमिका लिहिल्या जातात, असं तुम्हाला वाटतं? ज्येष्ठ कलाकारांसाठी लिहिलेल्या चांगल्या भूमिका फक्त अमिताभ बच्चन यांनाच मिळतात. त्यातून काही उरलंसुरलं असेल तर त्या माझ्यासारख्या अभिनेत्याच्या वाट्याला येतात. अशा भूमिका नाकारल्यानंतर आमच्याकडे काहीच काम उरत नाही."

हेही वाचा: लिएंडर-किम शर्माच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धनची प्रतिक्रिया

हेही वाचा: Video: घटस्फोटानंतरही 'ऑल इज वेल', आमिर-किरणचा डान्स व्हिडिओ व्हायरल

ज्येष्ठ कलाकारांना काम मिळत नसल्याने वयाच्या ७१व्या वर्षीसुद्धा स्वत:ला फिट ठेवण्याचा जिवापाड प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पुढे म्हटलं. "वयाच्या ७१ व्या वर्षीही मी या २५ वर्षीय तरुणांना मात देण्यासाठी दररोज दोन तास वर्कआऊट करतो. म्हातारपण दिसू नये म्हणून मी माझे केस आणि मिशी रंगवतो. तुम्ही मला शेरनी चित्रपटात पाहिलं असणार. ७१ वर्षांचा असूनदेखील मी त्यात ५०-५५ वर्षांचा दिसण्यासाठी प्रयत्न केले आहेत. असं नाही केलं, तर मला काम मिळणारच नाही", असं शरत म्हणाले.

शरत यांनी १९७० च्या दशकात सहाय्यक भूमिका साकारत करिअरची सुरुवात केली. 'गुलाम', 'साथियाँ', 'फिर हेरा फेरी', 'बजरंगी भाईजान' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.

loading image