Bharat Jodo Yatra: अभिनेत्री पूजा भट्ट राहूल गांधींसोबत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सामील

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं स्वागत राजकीय वर्तुळातूनच नाही तर मनोरंजन क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे.
Actor Pooja Bhatt joins Congress’ Bharat Jodo Yatra in Telangana
Actor Pooja Bhatt joins Congress’ Bharat Jodo Yatra in TelanganaGoogle
Updated on

Bharat Jodo Yatra: संपूर्ण भारतात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत केवळ राजकारणीच नाहीत तर फिल्मी सितारे देखील सहभागी होताना दिसत आहेत. अभिनेत्री पूजा भट्ट देखील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. सध्या ही यात्रा तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे पोहोचली असून, या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह पूजा भट्टही सामील झाली आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पूजा भट्ट ,राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी होत चालताना दिसत आहे . राहुल गांधींसोबत एकाच फ्रेममध्ये पूजा भट्ट... हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.(Actor Pooja Bhatt joins Congress’ Bharat Jodo Yatra in Telangana)

Actor Pooja Bhatt joins Congress’ Bharat Jodo Yatra in Telangana
Shahrukh Khan: बायकोइतकीच शाहरुखच्या आयुष्यात महत्वाची आहे 'ती', कोण आहे पूजा ददलानी?

या प्रवासात सामील होणारी पूजा भट्ट ही पहिली बॉलिवूडची सेलिब्रिटी आहे. यात्रेत सहभागी झाल्यावर पूजाने हात हलवून समर्थकांना अभिवादन केले. यादरम्यान अभिनेत्रीचा यात्रेतील सहभागही समर्थकांना उत्साह देऊन गेला.

पूजा भट्टने भारत जोडो यात्रेतील आपल्या सहभागा संदर्भात ट्वीट करत लिहिलं आहे की,''काही वेळासाठी मी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले, मी या यात्रेत साडे दहा किलोमीटपर्यंत प्रवास केला''. तिनं पोस्टमध्ये भारत जोडो यात्रेचा हॅशटॅगही घेतला आहे. एक स्मायली आणि हात जोडलेली इमोजी देखील तिनं शेअर केली आहे. राहुल गांधींसोबतचे पूजाचे भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले फोटो जोरदार व्हायरल झाले आहेत.

Actor Pooja Bhatt joins Congress’ Bharat Jodo Yatra in Telangana
Amitabh Bachchan: चाहत्यांना इतका मान फक्त अमिताभच देऊ शकतात; म्हणाले,''मी कधीच...''

स्वरा भास्करनेही याआधाी भारत जोडो यात्रेचे आणि राहुल गांधींचे कौतुक केले आहे...

यापूर्वी स्वरा भास्करने राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेचे कौतुक केले होते. स्वराने ट्विटमध्ये लिहिले आहे की, "निवडणुकीत पराभव, ट्रोलिंग, वैयक्तिक हल्ले आणि सतत टीका करूनही राहुल गांधी कोणत्याही जातीय वक्तृत्वाला बळी पडले नाही. या देशाची सद्य स्थिती पाहता भारत जोडोसारखे प्रयत्न कौतुकास्पद आहेत''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com