Salaar Trailer News: प्रभासच्या बहुचर्चित - बहुप्रतिक्षित 'सालार' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सालार सिनेमाची आधीपासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. अखेर सालारचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झालाय.
सालारच्या ट्रेलरमध्ये प्रभासचा तडफदार अॅक्शन अंदाज पाहायला मिळतोय. त्याच्यासोबत अभिनेता पृथ्वीराजसुद्धा दिसतोय.
सालारच्या ट्रेलरमध्ये दोन जिगरी मित्रांची गोष्ट पाहायला मिळतेय. सालारमध्ये केजीएफ सिनेमासारखीच एक अनोखी दुनिया दिसतेय. या काळ्याकुट्ट शहरात प्रभास आणि पृथ्वीराज हे दोन मित्र अन्यायाचा सामना करत आहेत.
ज्याच्याशी पटत नाही त्याला थेट यमसदनी धाडण्याचं काम, प्रभास करताना दिसतोय. पण पुढे प्रभास - पृथ्वीराज या दोन जिगरी मित्रांमध्ये संघर्षाची ठिणगी पेटताना दिसते. मग पुढे काय होणार? हे सालार सिनेमा पाहूनच कळेल.
सालार चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढत आहे आणि चित्रपटाची घोषणा झाल्यापासून म्हणजेच टीझर आणि ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीपासूनच हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे. अलीकडेच एका रोमांचक अपडेटमध्ये, मुंबई शहराच्या मध्यभागी चित्रपटाचा एक विशाल 120 फूट कट-आउट स्थापित करण्यात आला आहे.
हा आतापर्यंतचा सर्वात उंच भारतीय चित्रपट कटआउट आहे. Salar: Part 1: Ceasefire ची रिलीजपुर्वीच हवा दिसून येते.
सालार या अॅक्शन फिल्मचा कालावधी 2 तास 55 मिनिटांचा असून त्याला सेन्सॉर बोर्डाने 'ए' प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपटात अनेक धोकादायक युद्ध दृश्ये आणि हिंसाचार आहेत. 'ए' प्रमाणपत्राची बातमी हा चित्रपटाच्या मोठ्या प्रमाणाचा पुरावा आहे.
Hombale Films Salar: Part 1: Ceasefire मध्ये प्रभास सोबत पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन आणि जगपती बाबू दिसणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती विजय किरगांडूर यांनी केली आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.