फॅन गर्लने दिली प्रभासच्या गालावर चापटी (व्हिडीओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 6 March 2019

फॅन्स मधूनच एक तरुणी अतिउत्साहात त्याच्या जवळ गेली आणि सोबत फोटो काढला. मात्र नंतर तिला हे स्वप्नवत वाटले असावे त्यामुळे तिने प्रभासच्या गालाला स्पर्श केला....

मुंबई : सुपरस्टार्सचे सुपर फॅन्स म्हटले की अतिउत्साहात बऱ्याचदा चूकीचे वागतात. असाच एक अनुभव अभिनेता प्रभासला नुकताच आला आहे. त्याच्या एका क्रेझी फॅनने त्याला चक्क गालावर चापट लगावली!

होय, हे खरं आहे. हा प्रकार घडला विमानतळावर. म्हणजेच विमानतळावरील सर्व गर्दीच्या समोर प्रभासला गालावर चापट खावी लागली. एका अतिउत्साही तरुणीने प्रभास दिसल्या क्षणीच उड्या मारत त्याच्या दिशेने गेली. प्रभासनेही तिला हसून प्रतिसाद दिला. पण ती असं काही करेल याचा अंदाज आजूबाजूच्या कुणालाही आला नाही.

सध्या प्रभास 'साहो' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री श्रध्दा कपूर देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. सुजित सरकार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या शूटींग निमित्तानेच प्रभास लॉस एंजलिसला गेला होता. तेथून परतताना विमानतळावर त्याच्या फॅन्सनी त्याला घेरले. प्रत्येकाला प्रभाससोबत फोटो काढायचा होता. या फॅन्स मधूनच एक तरुणी अतिउत्साहात त्याच्या जवळ गेली आणि सोबत फोटो काढला. मात्र नंतर तिला हे स्वप्नवत वाटले असावे त्यामुळे तिने प्रभासच्या गालाला स्पर्श केला. पण तिला आपण चापट मारतोय याचे भान राहीले नाही आणि तिचा हात जोरात प्रभासच्या गालावर बसला. 

हा प्रकार बघून विमानतळावरील सर्वच हसू लागले पण प्रभासही बावचळला. ही फॅन भेट कॅमेरात कैद नक्की झाली. त्याचाच हा व्हिडीओ....

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Her excitement at peaks , Very lucky fans . Los Angeles prabhas fans , #Prabhas #Saaho #ShadesOfSaahoChapter2 #ShadesOfSaaho2

A post shared by Prabhas (@uppalapati_prabhas_official) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor prabhas slapped by crazy fan after taking a photo