Salaar Teaser: प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचा टीझर रिलीज; KGF स्टाईल अ‍ॅक्शन अन्...

प्रभासचा सालार हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे
Salaar Teaser
Salaar TeaserEsakal

अभिनेता प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचं कौतुकही झालं आणि काही लोकांनी टीका केली. आता प्रभासचा 'सालार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. (Entertainment News in Marathi)

प्रभासचा आगामी चित्रपट सालारचा टीझर आज 6 जुलै रोजी सकाळी 5.12 मिनिटांनी प्रदर्शित झाला आहे. प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सालार'चा अधिकृत टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये अॅक्शन पाहायला मिळते. जे मोठ्या पडद्यावर पाहणे आणखीनच रोमांचक असणार आहे. सालारचा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज होताच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे आणि ट्रेंडमध्येही आला आहे. आज प्रभासच्या चाहत्यांना सालाटच्या टीझरच्या रूपाने एक मोठी भेट मिळाली आहे.(Entertainment News in Marathi)

प्रभासचा सालार हा चित्रपटही KGF दिग्दर्शक प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आशा आहे की यशच्या केजीएफप्रमाणेच प्रभासचा सालारही सुपरहिट असेल आहे.

Salaar Teaser
ऑन स्क्रीन : अफवाह : डोळे उघडणारा पॉलिटिकल ड्रामा

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, प्रशांत नील दिग्दर्शित प्रभास स्टारर सालार पार्ट 1: सीझ फायरचा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित झाला आहे. काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत निर्मात्यांनी पहाटे ५:१२ वाजता टीझरची घोषणा करून प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढवला.

KGF 2 मध्ये रॉकी 5.12 मिनिटांनी समुद्रात बुडतो आणि अशा परिस्थितीत सालारचा टीझर रिलीज करणे हे दोन्ही चित्रपटांमधील संबंध दर्शवते. तर हा टीझर पाहताना तुम्हाला KGF ची आठवण होईल. (Entertainment News in Marathi)

Salaar Teaser
Kangana Ranaut : बॉलीवूडच्या क्वीनचा पुन्हा दणका! 'तेजस' चित्रपटाची घोषणा

चित्रपटाच्या टीझरमध्ये अॅक्शन मोडमध्ये असलेल्या प्रभासची झलक पाहायला मिळते आणि यानंतर पृथ्वीराजचा लूकही समोर आला आहे.

सालार चित्रपटात प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, ईश्वरी राव, जगपती बाबू, श्रिया रेड्डी, टिन्नू आनंद यांच्यासह अन्य कलाकार दिसणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित सालार हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी तेलुगू, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदीसह 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.(Entertainment News in Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com