ग्रेट इंडियन लूट फेस्टिव्हल...प्रकाश राज यांची GST वरुन अर्थमंत्र्यांवर टीका

सर्वसामान्यांच्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंवर जीएसटी लावल्याने अभिनेता प्रकाश राज यांनी अर्थमंत्र्यांवर टीका केली.
Prakash Raj And Nirmala Sitharaman
Prakash Raj And Nirmala Sitharaman esakal

केंद्रातील मोदी सरकारने दही, पनीर, लस्सी, गव्हाचे पीठ या सारख्या पॅक्ड वस्तूंवर ५ टक्क्यांनी वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्याच्या निर्णयावरुन केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. जीएसटी परिषदेची नुकतीच चंदीगडमध्ये बैठक पार पडली. यात वरील वस्तूंवर जीएसटी (GST) लावण्यावर निर्णय घेतला गेल होता. १८ जुलैपासून तो निर्णय लागू करण्यात आला आहे. आता यावर बाॅलीवूड अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विट करत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या टीका केली आहे. (Actor Prakash Raj Criticize Nirmala Sitharaman Imposing On Food Items)

Prakash Raj And Nirmala Sitharaman
नवरा म्हणून कसा आहे रणवीर सिंग, दीपिकाला देतो का इंटीमेट सीनसाठी परवानगी?

अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांनी ट्विट करत लिहिले, की इंडियन मनी हाईस्टबरोबर अभिनेत्याने एक छायाचित्रही शेअर करत लिहिले की ग्रेट इंडियन लूट फेस्टिव्हल आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या छायाचित्राबरोबर या वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लावली आहे, त्याची यादी दिली आहे.

Prakash Raj And Nirmala Sitharaman
देव-देवतांची फोटो शेअर करत प्रकाश राज म्हणाले,आपण कुठे चाललो आहोत?

प्रकाश राज यांच्या ट्विटवर अनेक युजर्सने आपल्या प्रतिक्रिया दिल्या. हशन कुरेशी म्हणतात, लवकरच ट्विट करण्यावर जीएसटी लावला जाईल आणि सर्वात जास्त तुमच्यावर लावला जाईल. दुसरा यूजर लिहितो, सबका साथ सब पर टॅक्स. सुरेश नावाचा युजर म्हणतो, शाई, पेन, पेन्सिल, रबर, कटर, वीजही महाग झाले आहे. याचा एकूण अर्थ काय तर शिकणार भारत तर तेव्हा लढेल भारत. हरिश नावाचा यूजर प्रकाश राज यांना सल्ला देताना म्हणतो, सर असे न हो की तुम्ही खरे बोलण्यावर ईडीचे बोलणे तुम्हाला येईल.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com