esakal | अभिनेता निखिल द्विवेदीला झाली कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

nikhil

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, निर्माता निखिल द्विवेदी याला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

अभिनेता निखिल द्विवेदीला झाली कोरोनाची लागण

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, निर्माता निखिल द्विवेदी याला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा: कपिल शर्माच्या घरी दुस-यांदा येणार चिमुकला पाहुणा, व्हिडिओमध्ये दिसलं पत्नी गिन्नीचं बेबी बंप

निखिल गेल्या काही दिवसांत सर्दी आणि खोकल्याच्या त्रासामुळे त्रस्त होता. दरम्यान त्याने एकदा कोरोना टेस्ट केली. त्याची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली होती. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने पुन्हा एकदा टेस्ट करुन पाहिली. यावेळी मात्र त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. निखिल सोबतच त्याच्या कुटुंबियांची देखील टेस्ट करण्यात आली होती मात्र घरातील सर्व मंडळींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या निखिलवर त्याच्या घरातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात मागील २४ तासात ५ हजार ५३५ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर १५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण १७ लाख ६३ हजार ५५ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. ज्यापैकी १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर आज घडीला ७९ हजार ७३८ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर महाराष्ट्रात आजपर्यंत ४६ हजार ३५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

actor producer nikhil dwivedi tests positive for coronavirus after complaining loss of taste  

loading image