Pushkar Jog: बीएमसी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' विधानाबद्दल पुष्करने मागितली माफी! म्हणाला,"माझा हेतू फक्त..."

पुष्कर जोगने दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे
actor pushkar jog apology after bmc workers controversy statement
actor pushkar jog apology after bmc workers controversy statementSAKAL

Pushkar Jog News: अभिनेता पुष्कर जोग हा मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता. पुष्करला आपण आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. पुष्कर त्याच्या सोशल मीडियावर विविध सामाजिक, राजकीय विषयांवर त्याची मतं व्यक्त करत असतो.

अशातच पुष्करने काही दिवसांपुर्वी बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. यामुळे बराच वाद होऊन पुष्करवर टीका झाली. अखेर पुष्करने त्याबद्दल जाहीर माफी मागितलीय.

actor pushkar jog apology after bmc workers controversy statement
BB 17 Ankita Lokhande: बिग बॉसमध्ये विजयी न झाल्याने अंकीता भावूक? व्हिडीओ व्हायरल

पुष्करचा जाहीर माफीनामा

पुष्करने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करुन लिहीलंय की, "मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी.."

पुष्कर काय म्हणाला होता?

पुष्करने सोशल मीडियावर बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल लिहीलं होतं की, "काल बीएमसीच्या काही कर्मचारी.. माझ्या घरी आल्या आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. ते जर बाई माणूस नसते तर २ लाथ नक्कीच मारल्या असत्या.. कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका otherwise जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार"

पुष्करच्या या विधानावर त्याच्यावर विविध स्तरांवरुन टीका झाली. आता पुष्करने माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा पडला, असं म्हणता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com