esakal | रजत बेदीच्या अडचणीत वाढ; कार धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

रजत बेदीच्या अडचणीत वाढ; कार धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू

रजत बेदीच्या अडचणीत वाढ; कार धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेता रजत बेदीची डोकेदुखी वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. काल त्याच्या गाडीनं एका पादचाऱ्याला धडक दिली होती. रजतनचं त्याला रुग्णालयातही दाखल केलं होतं. मात्र उपचारा दरम्यान त्या पादचाऱ्याचा मृत्यु समोर झाल्याची धक्कादायक बातमी सुत्रांनी दिली आहे. याबाबत एएनआयनं व्टिट करुन माहिती दिली आहे. पोलिसांनी रजतवर आयपीसीच्या 304 न्वये गुन्हा दाखल केला आहे. टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील आणि बॉलीवूडमधील सेलिब्रेटींच्या गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या धक्कादायक गोष्टी समोर येताना दिसत आहे. अभिनेत्यावर एका पादचाऱ्याला गाडीनं धडक दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पादचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या जखमी व्यक्तीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च हा बेदीच्या वतीनं केला जाणार होता. अशी माहिती त्याच्या कुटूंबियांनी दिली होती. जेव्हा ही घटना घडली तेव्हा रजतनं त्याला रुग्णालयात आणलं आणि त्याला दाखल केलं. मात्र त्यानं पोलिसांना दिलेल्या जबाबात आपल्या कारनं त्याला धडक दिल्याचा उल्लेख टाळल्याची माहिती पुढे आली होती. आपल्याच कारची धडक त्या व्यक्तीला बसली आहे हे रजतनं मान्य केलेलं नाही. याप्रकरणाची आधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, रजतच्या विरोधात आयपीसी आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची चौकशीही सुरु आहे. अजून पोलिसांनी रजतला अटक केलेली नाही. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जखमी व्यक्तीच्या डोक्याला मार लागला होता. तो गंभीर जखमी झाला. त्या व्यक्तीच्या पत्नीनं सांगितलं की, ते कामावरुन सहाच्या सुमारास परत येत होते. त्यावेळी रस्ता ओलांडताना त्यांना रजतच्या कारची धड़क बसली.

रजत बेदी हा एक मोठा सेलिब्रेटी आहे. त्यानं आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. तो एक टीव्ही मालिका निर्माता आणि उद्योजकही आहे. त्यानं काही मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. बहुतांशी चित्रपटांमध्ये त्यानं निगेटिव्ह रोल केले आहेत. कोई मिल गया, रॉकी, इंटरनॅशनल खिलाडी, चालबाज, रक्त, खामोशी यासारख्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो बॉलीवूडपासून लांब आहे. त्यानं परदेशात एक नवा बिझनेस सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: अभिनेता रजत बेदीच्या विरोधात गुन्हा दाखल, पादचाऱ्याला दिली धडक

loading image
go to top