esakal | Video: भूमी पेडणेकरचा फिटनेस फंडा; न थांबता चढते ९५० पायऱ्या
sakal

बोलून बातमी शोधा

bhumi

Video: भूमी पेडणेकरचा फिटनेस फंडा; न थांबता चढते ९५० पायऱ्या

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री भूमी पेडणेकरने Bhumi Pednekar 'दम लगा के हैशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र या चित्रपटातील भूमी आणि आताची भूमी यात प्रचंड फरक आहे, हे तुमच्या लक्षात येईलच. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात भूमीने एका स्थूल तरुणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचं वजन ७२ किलो इतकं होतं. भूमिकेसाठी तिने आणखी १५ किलो वजन वाढवलं होतं. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर भूमीने तिचं वजन कमी केलं आणि तिचं बदललेलं रुप पाहून सर्वजण थक्क झाले. एकेकाळी ८७ किलो वजन असलेली भूमी आता सोशल मीडियावर फिटनेसचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. न थांबता ९५० पायऱ्या चढल्याचा एक व्हिडीओ तिने पोस्ट केला होता. (bhumi pednekar climbs 950 stairs at a time know her wait loss journey slv92)

'द बॉडी अँड सोल प्रोजेक्ट' या इन्स्टाग्राम पेजवर भूमीचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत भूमी पायऱ्या चढताना दिसतेय. वजन कमी करण्यासाठी आणि शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी पायऱ्या चढ-उतार करणं अत्यंत फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे भूमीच्या वर्कआऊट रुटीनमध्ये याचा आवर्जून समावेश असतो.

हेही वाचा: भूमी करतेय कोरोना रुग्णांची मदत; आईला रुग्णालयात पाहिल्यापासून केला निश्चय

'दम लगा के हैशा' या चित्रपटानंतर भूमीने ३२ किलो वजन कमी केलं होतं. वजन कमी करण्याचा तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मात्र चिकाटीने आणि योग्य व्यायाम, आहाराच्या आधारे भूमीने वजन कमी केलं. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी भूमीने यश राज फिल्म्स कंपनीत सहा वर्षे असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं. 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'पती पत्नी और वो', 'सांड की आँख', 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे', 'दुर्गामती' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

loading image