Ram Charan For Oscars : ऑस्करच्या संभाव्य यादीत अभिनेता राम चरणचा उल्लेख; चाहत्यांमध्ये उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ram charan organises langar at golden temple post massive success of 'RRR'

ऑस्करच्या संभाव्य यादीत अभिनेता राम चरणचा उल्लेख; चाहत्यांमध्ये उत्साह

मुंबई : भारतात धुमाकूळ घातल्यानंतर राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या RRR सिनेमाची भूरळ परदेशी प्रेक्षकांनाही पडली आहे. अमेरिकेतही हा सिनेमा चांगला चालला असून तिथल्या समीक्षकांनी यातील कलाकारांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. इथल्या अनेक मासिकांमध्ये आणि न्यूज पोर्टल्सनी ऑस्कर २०२३ च्या नामांकनाची अंदाज यादी प्रसिद्ध केल्या आहेत. या यादीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीत राम चरणच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळं राम चरणचे चाहते भलतेच खूश झाले आहेत. आपल्या भावना त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत व्यक्त केल्या आहेत. (Ram Charan For Oscars mentions in nominations prediction list Excitement among fans)

RRR सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाल्यानंतर भारताबाहेरील मोठ्या प्रेक्षकांनाही या चित्रपटानं भूरळ घातली. पडद्यावरील भव्यदिव्य दृश्ये आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा हे सिनेमातील प्रमुख घटक आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत. दरम्यान, ज्यनिअर एनटीआर आणि राम चरण या जोडीच्या नावाची ऑस्कर नामांकनांच्या अंदाजांच्या यादीत स्थान मिळवल्याची बातमी शुक्रवारी व्हायरल झाली होती. त्यानंतर या दोघांच्या चाहत्यांना त्यांचा उत्साह आवरता आला नाही. अनेक चाहत्यांनी तर ट्विटरवर #RamCharanForOscars हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आणला.

पुढील वर्षी पार पडणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून पाठवण्यात येणाऱ्या सिनेमांमध्ये RRR सिनेमा टॉप टू सिनेमांपैकी एक असल्याचं बोललं जात आहे. जगभरातील अनेक समीक्षक, चित्रपट विश्लेषक आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी तर या सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांना ऑस्करच्या रेड कार्पेटवर चालण्याची चांगली संधी असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: Actor Ram Charan For Oscars Mentions In Nominations Prediction List Excitement Among Fans

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..