भगवान वाल्मिकींविषयी वादग्रस्त विधान, अभिनेता राणा जंग बहादूरांना अटक

भगवान वाल्मिकी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने कारवाई
Rana Jung Bahadur News
Rana Jung Bahadur Newsesakal

जालंधर : भगवान वाल्मिकींविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने पंजाबी अभिनेता राणा जंग बहादूर यांना जालंधर (Jalandhar) पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी एका टीव्हीवरील कार्यक्रमात भगवान वाल्मिकींविषयी (Bhagwan Valmiki) चुकीचा शब्द वापरल्याने धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. एका दिवसापूर्वीच न्यायालयाने त्यांच्या जामीनाची याचिका फेटाळली आहे. जालंधर आणि होशियारपूरमध्ये वाल्मिकी समाजाच्या तीव्र विरोधामुळे त्यांच्यावर नई बारादरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Actor Rana Jung Bahadur Detains By Jalandhar Police For Bhagwan Valmiki Comment)

Rana Jung Bahadur News
मित्र सिद्धार्थची आठवण येताच विद्युत जामवाल होतो भावूक, 'आईने खूप शिकवले'

वाल्मिकी समाजाने दिला होता बंदचा इशारा

या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच वाल्मिकी समाजाच्या शिष्टामंडळाने अकाली दल (Akali Dal) नेता चंदन ग्रेवाल यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्त गुरशरणसिंह संधू यांची भेट घेऊन राणा जंग बहादूर (Rana Jung Bahadur) यांना अटक करण्याची मागणी केली होती. वाल्मिकी समाजाच्या संघटनांनी अभिनेत्याला १० जुलैपर्यंत अटक न झाल्यास ११ जुलैला जालंधर बंदचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच त्यांनी बसस्थानकासह अनेक ठिकाणी निषेध करत राणा यांचा पुतळा जाळला होता.

Rana Jung Bahadur News
चित्रपटाच्या प्रमोशनमुळे झोपायला वेळच मिळेना! मग अभिनेता विमानातच...

एक महिन्यापूर्वीचे प्रकरण

हे प्रकरण जवळपास एक महिन्यापूर्वीचे आहे. एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात अभिनेता राणा जंग बहादूर यांनी भगवान वाल्मिकींविषयी वक्तव्य केले होते. वाल्मिकी समाजाच्या संघटनांनी त्यांच्यावर अपशब्द वापरल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. निदर्शनानंतर जालंधर पोलिसने नई बारादरी ठाण्यात प्रथम माहिती अहवालाची (एफआयआर) नोंद केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com