जेव्हा भन्साळींना हॅन्डसम हंक रणबीरच्या चेहऱ्यात दिसला होता दोष.. म्हणालेले,'तुझे डोळे खूपच..', Ranbir Kapoor Look | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Leela Bhansali & Ranbir Kapoor

Ranbir Kapoor News: जेव्हा भन्साळींना हॅन्डसम हंक रणबीरच्या चेहऱ्यात दिसला होता दोष.. म्हणालेले,'तुझे डोळे खूपच..',

Sanjay Leela Bhansali: रणबीर कपूर दिसायला हॅन्डसम आहे यात वादच नाही... पण तुम्हाला माहित आहे का रणबीरच्या याच हॅन्डसम लूकमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी एक दोष शोधून काढला होता.

तसं आपल्यापैकी अनेकांना हे माहित असेल की रणबीर कपूरनं आपल्या करिअरची सुरुवात ही संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरियां' या सिनेमातून केली..जो फारसा काही चालला नव्हता. पण त्यातील रणबीरच्या टॉवेल डान्समुळे त्याची गाडी मात्र इंडस्ट्रीत सुरू झाली.

बरं..अभिनेता म्हणून करिअर सुरू करण्याआधी रणबीर संजय लीला भन्साळी यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पहायचा. तेव्हा रणबीर आणि संजय लीला भन्साळींमध्ये चांगले संबंध असणार हे ओघानं आलंच.

पण आता 'तू झूठी..मै मक्कार' सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत रणबाीरनं संजय लीला भन्साळी यांनी आपल्या लूकमध्ये दोष शोधून काढले होते याविषयी खुलासा केला आहे.

चला जाणून घेऊया रणबीर नेमका काय म्हणाला आहे. (Actor Ranbir Kapoor revealed filmmaker Sanjay Leela Bhansali criticise his look)

कपूर कुटुंबाला अभिनयासोबतच सौंदर्याचं वरदान हे देवाकडूनच मिळालं आहे. या कुटुंबातील ९० टक्के लोकांनी अभिनयात आपलं नशीब आजमावलं आणि तिथे नाव कमवूनही दाखवलं. फक्त दिसण्याच्याच नाही तर आपल्या चांगल्या अभिनयाच्या बळावरही.

नेपोटिझमचा मुद्दा या घराण्यासाठी लागू होत नाही. कारण या घरातलं प्रत्येक नाणं खणखणीत वाजलं. आज लोक पृथ्वीराज कपूर यांच्यापासून याच घराण्यातला आजच्या काळातला सुपूत्र रणबीर पर्यंत साऱ्यांचे चाहते आहेत..त्यांच्या कामावर..दिसण्यावर फिदा आहेत.

पण जेव्हा रणबीरची ही मुलाखत व्हायरल होते ज्यात त्याच्या लूकवर संजय लीला भन्साळींनी तिरसट प्रतिक्रिया दिली असं म्हणतो तेव्हा विश्वास बसत नाही.

रणबीरनं आपल्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, ''संजय लीला भन्साळी यांनी माझ्या डोळ्यात दोष काढला होता. माझे डोळे खूप दुःखी वाटतात असं ते म्हणाले होते. माझं बोन स्ट्रक्चर असं आहे की ज्यामुळे माझ्या चेहऱ्यावर मी काही भाव आणले नाहीत तर माझे डोळे रडके वाटतात. आणि हे खऱंही आहे म्हणा..मला भूमिका साकारताना पडद्यावर रडणं सोपं वाटतं हसण्यापेक्षा''.

रणबीरनं 'तू झूठी मै मक्कार' या रोमॅंटिक कॉमेडी सिनेमात काम केलं आहे. ही भूमिका सतत हसण्याची-हसवण्याची होती म्हणून अथक परिश्रम करावे लागले ती साकारताना असं देखील म्हणाला होता.

८ मार्च,२०२३ रोजी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनित 'तू झूठी..मै मक्कार' सिनेमा रिलीज झाला आहे.