Ranbir Kapoor: 'मला आता या अभिनेत्रीसोबत करायचयं काम...', रणबीरने सांगितली त्याच्या मनातली इच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor

Ranbir Kapoor: 'मला आता या अभिनेत्रीसोबत करायचयं काम...', रणबीरने सांगितली त्याच्या मनातली इच्छा

ब्रह्मास्त्रनंतर रणबीर कपूर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर यशाची चव चाखत आहे. त्याचा 'तू झुठी मैं मक्कार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीर कपूरने त्याच्या करिअरबद्दल अनेक खुलासे केले.

इंडियन आयडॉलच्या मंचावर, सावरिया अभिनेता रणबीर कपूरने खुलासा केला की, त्याला अनुष्का शर्मासोबत सेटवर काम करायला खूप आवडते. आता अलीकडेच अभिनेत्याने सांगितले की, श्रद्धा, आलिया, दीपिका आणि कतरिनासोबत काम केल्यानंतर आता त्याला कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करण्याची इच्छा आहे.

होळीच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी रणबीर कपूर शहरा-शहरात जाऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत होता. यादरम्यान, प्रसारमाध्यमांशी खास संवाद साधताना, जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याला कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायचे आहे. या प्रश्नाला लगेच उत्तर देताना रणबीर कपूरने सांगितले की, मला कृती सॅनॉनसोबत काम करायचे आहे.

'तू झुठी मैं मक्कार'मध्ये चाहत्यांना श्रद्धा आणि रणबीरची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळाली. दोघांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. रणबीर-श्रद्धा स्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत 25 कोटींचा व्यवसाय केला आहे.

तो 2018 नंतर 2022 मध्ये आलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसला, ज्यामध्ये त्याने शिवाची भूमिका केली होती. या चित्रपटानंतर त्याने श्रद्धा कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कार'मध्ये काम केले.

आता रणबीर कपूर लवकरच संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये रश्मिका मंदान्ना त्याच्यासोबत पहिल्यांदाच जोडी करताना दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरचा पूर्णपणे वेगळा लूक पाहायला मिळणार आहे.