हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट पॅटिनसन कोरोना पॉझिटीव्ह, 'द बॅटमॅन'चं शूटींग थांबवलं

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 4 September 2020

प्रसिद्ध अमेरिकी अभिनेता रॉबर्ट पॅटिनसनला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकी मिडिया रिपोर्ट्सनुसार रॉबर्टची कोविड-१९ टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.

मुंबई- प्रसिद्ध अमेरिकी अभिनेता रॉबर्ट पॅटिनसनला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकी मिडिया रिपोर्ट्सनुसार रॉबर्टची कोविड-१९ टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. नुकतंच पॅटिनसनने द बॅटमॅनचं शूटींग लंडनमध्ये सुरु केलं होतं जे आता थांबवण्यात आलं आहे. मात्र अजुनही पॅटिनसन यांच्याकडून याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

हे ही वाचा: अभिनेते दिलीप कुमार यांना त्यांच्या दोन्ही भावांच्या निधनाची कल्पना नाही, सायरा यांनी सांगितलं कारण  

याबाबतची माहिती देताना वॉर्नर ब्रदर्सच्या प्रवक्त्याने सांगितलं की, 'द बॅटमॅन' प्रोडक्शनच्या एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. नियमानुसार तो आता आयसोलेशनमध्ये आहे. सध्या शूटींग थांबवलं गेलं आहे.' मॅट रीव्स यांच्या 'द बॅटमॅन' सिनेमाची खूप दिवसांपासून होत होती. लॉकडाऊनमुळे सिनेमाचं  शूटींग थांबवलं गेलं होतं.एक सप्टेंबरपासूनंच शूटींग पुन्हा सुरु करण्यात आलं होतं मात्र आता रॉबर्ट पॅटिनसनला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा शूटींग थांबवण्यात आली आहे. 

या सिनेमाचे दिग्दर्शक मॅट रिव्ह यांनी सांगितलं की 'सिनेमाचं तीन महिन्यांचं शूटींग बाकी आहे जे लवकरच पूर्ण केलं जाईल. निर्माते या सिनेमाचं शूट वर्षाच्या शेवटपर्यंत संपवण्याचा विचार करत आहेत. जेणेकरुन २०२१ मध्ये सिनेमा रिलीजसाठी तयार असेल'. सिनेमाच्या टीमने रॉबर्ट पॅटिनसनचा या सिनेमातील लूक फेब्रुवारीमध्येच रिलीज केला होता. 

रॉबर्ट पॅटिनसनच्या आधी क्रिस्चन बेल बेन अफ्लेक आणि जॉर्ज क्लूनी सारख्या कलाकारांंनी बॅटमॅनची भूमिका साकरली होती. बॅटमॅनमध्ये जोई क्रॅविएट्स कॅटवूमनच्या भूमिकेत आहे. तर पॉल डॅनो रिडलरच्या भूमिकेत ऐंडी सरकिस अल्फ्रेड पेनीवर्थच्या भूमिकेत, कॉलिन फरेल पेंग्विंनच्या भूमिकेत आणि जेफरी राईट जिम गॉरडनच्या भूमिकेत दिसून येतील. हा सिनेमा २५ जून २०२१ ला रिलीज होण्याच्या तयारीत आहे.    

actor robert pattinson has covid 19 halting the batman production in london  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor robert pattinson has covid 19 halting the batman production in london