Salman Khan: 'मूव्ह ऑन कर', किसी का भाई किसी की जानच्या ट्रेलर लॉन्चवेळी सलमान खानने शहनाजला दिला सल्ला

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टा बॉलीवूडने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
salman khan and shehnaaz gill
salman khan and shehnaaz gill Sakal

बिग बॉस फेम शहनाज गिल सध्या तिच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काल म्हणजेच ११ एप्रिल रोजी मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

यादरम्यान सलमान खान, पूजा हेगडे, पलक तिवारी आणि चित्रपटाची संपूर्ण टीम एकत्र दिसली. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच वेळी, या कार्यक्रमाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान शहनाजच्या लव्ह लाईफबद्दल बोलत आहे.

खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टा बॉलीवूडने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान खान त्याच्या मागे उभ्या असलेल्या शहनाजकडे वळतो आणि तिला म्हणताना दिसतो, 'शहनाज, मला वाटतं तू आता तुझ्या आयुष्यात पुढे जावं. कारण मला या सगळ्या गोष्टी खूप जाणवतात आणि लक्षात येतात. मला माझ्याबद्दलही हे लक्षात येतं.' बिग बॉसच्या वेळेपासून सलमान खानचे शहनाजसोबत खास नाते आहे. याच कारणामुळे ती एका अभिनेत्याच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

salman khan and shehnaaz gill
Rakhi Sawant ला 17 वर्षापूर्वी केलेलं किस मिकाला अजूनही सतावतंय..गायक या प्रकरणात पुन्हा पोहोचला हाय कोर्टात..

या कार्यक्रमात शहनाज गिल पहिल्यांदाच खूप बोल्ड अवतारात दिसली आहे. ज्यामध्ये ती खूप कॉन्फिडंट दिसत होती. ट्रेलर लाँचदरम्यान अभिनेत्री ब्लॅक लूकमध्ये दिसली. तिने ब्लॅक शॉर्ट्स आणि बॉडी फिट ब्लॅक डीपनेक टॉपसह ब्लेझर घातला होता. मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअपने अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला. जे अप्रतिम दिसत होते.

या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय पंजाबी गायक जस्सी गिल, पलक तिवारी, दाक्षिणात्य अभिनेता व्यंकटेश आणि भूमिका चावला देखील यात दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com