
मदत म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून.. संतोष जुवेकरचं मोठं सामाजिक पाऊल..
santosh juvekar : झेंडा, मोरया, एक तारा आणि यासारखे कितीतरी चित्रपट गाजवलेला एक उत्तम अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. तो सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. संतोष अभिनया सोबत सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. नुकतेच त्याने आवाहन केले आहे. 'दत्तक पालक व्हा' असे संतोषने या पोस्टमध्ये म्हंटले आहे. (actor santosh juvekar shared post for social appeal to adopt chid education)
त्याने इन्स्टाग्रामवर दत्तक पालक व्हा, असे आवाहन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात संतोष म्हणतो..
'घरच्यांना बरोबर मित्र मैत्रिणींना बरोबर बाहेर कधी नुसतं जेवायला गेलो तरी ६ ७ हजार bill सहज येत. मग जर फक्त १० हजारात आपण एखाद्या मुलाचं/मुलीचं वर्षाचं अन्न नक्कीच पुरवू शकतो.
वर्षातन एखादी गोव्याची trip केली तरी २० २५ हजार सहज खर्च होतात आपले. मग फक्त १५ हजारात एखाद्या मुलाचा/मुलीचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च नक्कीच करून त्या मुलाचे/ मुलीचे दत्तक पालकत्व स्वीकारू शकतो आपण.
आणि हे सगळं ज्यांना मनापासून करावंसं वाटतं आणि जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत आणि ज्यांना कुठलीही अडचण नाही त्यांनी नक्कीच कराव पण मदत म्हणुन नाही तर कर्तव्य म्हणुन.आणि ही बळजबरी नाही”, अशी पोस्ट संतोष जुवेकरने शेअर केली आहे.'
ग्राममंगल संस्थेच्या मुक्त शाळेत शिकणाऱ्या आदिवासी मुलांसाठी ही मदत मागण्यात आल्याची माहिती संतोषने जोडलेल्या पत्रातून समजते. या संस्थेला करोना काळात मोठा फटका बसला, त्यामुळे सध्या इथे शिकणाऱ्य २०० मुलांच्या जेवणाचा आणि शिक्षणाचा आर्थिक खर्च भागवण्यासाठी दानवीरांना हे आवाहन करण्यात आले आहे. विशेष संतोषने स्वतः या सामाजिक काम सहभाग घेतला आहे.
Web Title: Actor Santosh Juvekar Shared Post For Social Appeal To Adopt Chid Education
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..