लॉकडाउनमध्ये महाभारतातील हा अभिनेता आहे अडचणीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

सतीश कौल यांनी 2011 मध्ये पंजाबला जाऊन ऍक्‍टिंग क्‍लास सुरू केला होता. 2015 मध्ये माझ्या पाठीचं हाड मोडल्यानंतर जे काम सुरू होते ते थांबवावं लागले. दोन वर्ष मी रुग्णालयात होतो. नंतर मला वृद्धाश्रमात जावे लागले. तिथे मी दोन वर्ष राहिलो, असं सतीश कौल सांगतात. 

काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गोरगरीब, हातावरील पोट असलेले मोल मजूर, कामगार वर्ग यांना असे वाटतं आहे की, आपण जीवन कसे जगावे...? पोटाची खळगी भरण्यासाठी आणखीन आपल्याला काय काय करावे लागेल...? असे एक ना अनेक प्रश्‍न अनेकांना भेडसावत आहे. त्याच पद्धतीने लॉकडाउनमुळे एकीकडे सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असतानाही सर्वसामान्यांसोबतच चित्रपट सृष्टीतील काही अभिनेते अडचणीत आहेत. त्यातीलच एक प्रसिद्ध पंजाबी अभिनेते सतीश कौल यांना सध्या प्रचंड आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

सतीश कौल यांनी अनेक हिंदी चित्रपट तसेच महाभारतातही काम केले आहे. दरम्यान, सतीश कौल यांनी आपण वृद्धाश्रमात असल्याचे वृत्त चुकीचे असून, अफवा असल्याचे सांगितले आहे. कौल यांनी तीनशेहून अधिक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. महाभारतात त्यांनी इंद्राची भूमिका केली होती. 

73 वर्षीय सतीश कौल यांनी "प्यार तो होना ही था', "आंटी नंबर 1' या चित्रपटांमध्येही काम केले आहे. तसंच "विक्रम और वेताल' सारख्या कार्यक्रमातही कौल झळकले होते. सतीश कौल यांनी 2011 मध्ये पंजाबला जाऊन ऍक्‍टिंग क्‍लास सुरू केला होता. 2015 मध्ये माझ्या पाठीचं हाड मोडल्यानंतर जे काम सुरू होते ते थांबवावं लागले. दोन वर्ष मी रुग्णालयात होतो. नंतर मला वृद्धाश्रमात जावे लागले. तिथे मी दोन वर्ष राहिलो, असं सतीश कौल सांगतात. 

आपण अभिनय करीत असताना लोकांनी जे प्रेम दिलं त्याचा मला फार अभिमान वाटतो, असे सांगताना आपल्याला सध्या कोणतीही तक्रार नसल्याचेही ते म्हणतात. जर लोक मला विसरले असतील तर ठीक आहे. मला सर्वांकडून खूप प्रेम मिळाले असून त्यासाठी मी आभारी आहे. मी सदैव त्यांचा ऋणी राहीण. मी स्वत: राहू शकेन असे घर विकत घेण्यासाठी सक्षम व्हावे एवढीच माझी अपेक्षा आहे. 

मला कोणीतरी काम द्यावे

मी अजूनही जिवंत आहे आणि सगळं काही संपलेलं नाही. मला कोणीतरी काम द्यावे अशी अपेक्षा आहे. मला पुन्हा अभिनय करायचा आहे. मला मदतीची गरज आहे, मी चित्रपट सृष्टीला मदतीचे आवाहन करीत आहे, अशी इच्छा प्रसिद्ध पंजाबी अभिनेते सतीश कौल यांनी व्यक्त केली आहे. 

एक माणूस म्हणून मदतीची गरज

मी लुधियानात एका छोट्या भाड्याच्या घरात राहत आहे. मी आधी वृद्धाश्रमात राहत होतो. पण सत्यादेवी यांच्यामुळे सध्या भाड्याच्या घरात जागा मिळाली आहे. माझी प्रकृती चांगली आहे. पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लॉकडाउनमुळे परिस्थिती बिघडू लागली आहे. औषधं, भाजी आणि काही मूलभूत गोष्टींसाठी मी झगडत आहे. मला मदत करा, असे मी चित्रपटसृष्टीला आवाहन करतोय. अभिनेता असताना माझ्यावर इतक्‍या जणांनी प्रेम केले. पण, आता मला एक माणूस म्हणून मदतीची गरज आहे, असं सतीश कौल यांनी सांगितले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Satish Kaul needs help