Saurabh Gokhale: अभिनेता सौरभ गोखलेच्या 'फौजी'नं वेधलं लक्ष.. का होतेय चर्चा?

सौरभ गोखले बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर..
actor saurabh gokhale film fauji will release soon
actor saurabh gokhale film fauji will release soonsakal

Saurabh Gokhale marathi movie fauji: आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेता सौरभ गोखले यांनी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि जाहिरात विश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

आजवरच्या आपल्या प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा जपत रसिकांना मनमुराद आनंद देणारा हा अभिनेता आता एका जिगरबाज सैनिकाच्या ‘रफ अँड टफ’ भूमिकेत दिसणार आहे. कमांडोच्या वेशातील सौरभचा नवा लूक नुकताच समोर आला आहे.

आगामी ‘फौजी’ या मराठी चित्रपटामध्ये एका निडर सैनिकाची भूमिका तो साकारत आहे. मातृपितृ फिल्म्स् प्रस्तुत घनशाम येडे निर्मित आणि दिग्दर्शित ‘फौजी’ देशाचा प्राण, ‘आन बान शान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(actor saurabh gokhale film fauji will release soon)

actor saurabh gokhale film fauji will release soon
Gautami Patil: धन्य ती माऊली! गौतमी पाटीलच्या आईचा पहिला Video व्हायरल..

‘फौजी’ सिनेमाच्या निमित्ताने मला सैनिकाची भूमिका साकारायला मिळाली असून त्यासाठी आवश्यक ते ट्रेनिंग सध्या मी घेत आहे. देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकाची भूमिका साकारणं हे माझ्यातील अभिनेत्यासाठी आनंददायी तितकेच आव्हानात्मक आहे, असं सौरभ सांगतो.

अभिनेता सौरभ गोखले यांच्यासोबत प्राजक्ता गायकवाड, नागेश भोसले, शहाबाज खान, अरुण नलावडे, कल्याणी चौधरी, संजय खापरे, अश्विनी कासार, सुनील गोडबोले, हंसराज जगताप, सिद्धेश्वर झाडबुके, रोहित चव्हाण, विवेक चाबुकस्वार, जयंत सावरकर, सुहास गरगडे, विश्वजित बेलदार, संकेत तटकरी, घनशाम येडे हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.

actor saurabh gokhale film fauji will release soon
Kiran Mane: 'तुझ्या घरचे.. तुझी जात..' शरद पवारांना धमकी देणाऱ्या सागर बर्वेचा किरण मानेंकडून खरपूस समाचार

शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि स्पॉट बॉय ते निर्माता दिग्दर्शक असा प्रवास करणाऱ्या घनशाम येडे यांनी ‘फौजी’ चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला असून, चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते घनशाम येडे यांची आहेत. छायांकन मोहन वर्मा तर संकलन विश्वजीत दोडेकर यांचे आहे.

साहसदृश्ये मोजेस फर्नांडिस यांची आहेत. ध्वनी अनिल निकम तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील यांनी सांभाळली आहे. रंगभूषा आमोद दोषी तर वेशभूषा नाशीर खान यांची आहे. निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी महेश चाबुकस्वार यांनी सांभाळली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com