'कोणं म्हटलं,वेबसीरीजच्या माध्यमातून संस्कृतीचा अपमान होतो'

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 26 November 2020

मागील काही दिवसांपासून ओटीटीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने काही सीरीज प्रदर्शित झाल्या आहेत. त्यात दाखविण्यात आलेल्या आशयावरुन सोशल मीडियातून टीका केली गेली आहे.

मुंबई -  वेबसीरीज मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. त्यात दाखविण्यात येणारा आशय यावर मर्यादा आणण्याचे प्रकार सुरु आहे. त्यासाठी तो विषय सेन्सॉर बोर्डाच्या अखत्यारीत यावेत यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न केले जात आहेत. अशा नियंत्रित परिस्थितीत कलेतील नाविन्य संपून जाईल अशी भीती काही कलावंतांनी व्यक्त केली आहे.

यासगळ्यात अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर सणसणीत टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून ओटीटीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने काही सीरीज प्रदर्शित झाल्या आहेत. त्यात दाखविण्यात आलेल्या आशयावरुन सोशल मीडियातून टीका केली गेली आहे. त्यामुळे या माध्यमावर निर्बंध आणले जावेत अशी मागणी करण्यात आली होती. त्याला निर्माते, दिग्दर्शक यांच्यावर टीका होत आहे.  

नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हुलू, हॉटस्टार यांसारख्या अनेक प्लॅटफॉर्मवरुन विविध मालिका प्रदर्शित होत आहेत.  त्यातून अश्लिलता आणि हिंसेचा प्रचार केल्याची टीका होत आहे. हे टीकाकार ओटीटी प्लॅटफॉर्म्स सेन्सॉरशीपची मागणी केली जात आहे.

हे ही वाचा: कोरोना काळातही बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी केली जबरदस्त कमाई  

 या मागणीला अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोध केला आहे. तसे झाल्यास सर्जनशिलता संपून जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.सिन्हा यांनी म्हटले आहे की,  वेब सीरिजच्या माध्यमातून धर्म आणि संस्कृती यांचा अपमान होतोय असे ऐकले आहे. मात्र ते खोटं आहे. खरं तर या टीकेच्या माध्यमातून त्यांना सर्जनशील कलाकारांसमोर अडथळे निर्माण करायचे आहेत. 

अमृता खानविलकर ते उषा नाडकर्णी, हिंदी मालिकांमध्ये छाप सोडणारे मराठी कलाकार

सेन्सॉरशीप लादून त्यांना कलाकारांच्या विचारांना आ़डकाठी करायची आहे. जर का तसे झाले तर प्रतिगामी विचारांच्या लोकांमुळे भरभराटीला येणारा उद्योग उध्दवस्त होईल. आपण यांना विरोध करायला हवा.” अशा आशयाचं ट्विट करुन शत्रूघ्न सिन्हा यांनी ओटीटी सेन्सॉरशीपवर भाष्य केलं. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor shatrughan sinha said Creating a fear through superstition religion is the worst way to kill art and creativity