Shreyas Talpade: पुष्पा फुल नही फायर! श्रेयस तळपदेच्या तळपायाची आग मस्तकात

एका प्रकरणामुळे श्रेयस तळपदेची तळपायाची आग मस्तकात गेली आहे
shreyas talpade, pushpa, majhi tujhi reshimgath
shreyas talpade, pushpa, majhi tujhi reshimgath

'पुष्पा फुल नही फायर', असं म्हणत श्रेयस तळपदेने पुष्पा हिंदी मध्ये गाजवला. श्रेयस तळपदेच्या हिंदी डबिंगने 'पुष्पा' सिनेमा गाजवला. पुष्पा २ ची श्रेयस तळपदेचे फॅन्स वाट बघत आहेत. पण एका प्रकरणामुळे श्रेयस तळपदेची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. श्रेयस तळपदेने त्याचं फेक अकाउंट बनवल्या प्रकरणी सोशल मीडियावर आवाज उठला आहे.

shreyas talpade, pushpa, majhi tujhi reshimgath
Shreyas Talpade : चॉकलेट बॉयची बिग बॉसच्या घरात एंट्री

श्रेयस तळपदेने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात श्रेयस लिहितो, “प्रिय मंडळी, सर्वांनी कृपया लक्ष द्या, हे ट्वीट माझ्या ऑफिशिअल अकाऊंटवरुन करण्यात आलेले नाही. माझ्या अधिकृत ट्वीटर हँडलचे नाव ‘श्रेयस तळपदे १’ असे आहे. हा व्यक्ती माझ्या नावाचा वापर करुन चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल रिपोर्ट करा, जेणेकरुन त्याचे ट्वीटर अकाऊंट बंद होऊ शकेल.

सध्या ट्विटरवर ‘श्रेयस तळपदे’ या नावाने असलेले ऑफिशियल व्हेरिफाईड अकाउंट आहे. त्या व्यक्तीने माझे नाव आणि माझे फोटो वापरले आहेत. मला त्याच्या अकाऊंटशी काहीही घेणेदेणे नाही. परंतु तो किंवा ती व्यक्ती माझ्या नावाचा वापर करत चुकीची माहिती पसरवत आहेत”, असं श्रेयस तळपदे म्हणाला. त्यामुळे श्रेयसची तळपायाची आग मस्तकात गेली आहे.

shreyas talpade, pushpa, majhi tujhi reshimgath
Prarthana Behere: प्रार्थनाच्या त्या व्हिडिओनं पोरांची उडवली झोप.. अंथरूणातच..

दरम्यान श्रेयस तळपदे हा सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत झळकत आहे. त्यात तो यश हि भूमिका साकारत आहे. श्रेयसने अलीकडेच आपडी थापडी या सिनेमात काम केले. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. हि मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. श्रेयस लवकरच कंगना राणावत सोबत इमर्जन्सी या हिंदी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात श्रेयस अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com