अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे शनिवारी पहाटे गिरगाव येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे शनिवारी पहाटे गिरगाव येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचेही निधन झाले होते.

"आपला माणूस', "अ डॉट कॉम मॉम', "एक अलबेला', "उंच भरारी', "करले तू भी मोहब्बत' आदी मराठी आणि हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले होते. "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसह अनेक मराठी मालिकांमधील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Shriram Kolhatkar passes away

टॅग्स