esakal | मैत्री, प्रेम आणि विश्वासाची गोष्ट सांगणारा ‘बेफाम’
sakal

बोलून बातमी शोधा

actor siddharth chandekar and actress sakhi gokhale starer film befam trailer release

अमोल लक्ष्मण कागणे निर्मित हा चित्रपट दिग्दर्शक कृष्णा कांबळे दिग्दर्शित आहे. 'बेफाम' चित्रपट येत्या 26 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. 

मैत्री, प्रेम आणि विश्वासाची गोष्ट सांगणारा ‘बेफाम’

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - यश आणि अपयशाचे समीकरण मांडणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर एक वेगळाच प्रवास दाखविण्यात आला आहे.  सिद्धार्थ आणि सखीची ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थला यशाच्या शिखरावर पोहोचण्यास कारणीभूत असलेल्या सखीची मैत्री, प्रेम आणि विश्वास यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

केवळ हिंदी नव्हे तर आता मराठी चित्रपटानं चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी आघाडी घेतली आहे. गेल्या महिनाभरापासून मराठीतल्या अनेक चित्रपटांचे टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सखी गोखले यांची नवी कोरी जोडी बेफाम या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

 अमोल लक्ष्मण कागणे निर्मित हा चित्रपट दिग्दर्शक कृष्णा कांबळे दिग्दर्शित आहे. 'बेफाम' चित्रपट येत्या 26 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.  ‘बेफाम’ हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे आणि अभिनेत्री प्रीतम लक्ष्मण कागणे प्रस्तुत असून लेखक विद्यासागर अध्यापक लिखित या चित्रपटाचे कथानक आहे. सिद्धार्थ आणि सखीसह या चित्रपटात अभिनेते विद्याधर जोशी, शशांक शेंडे, कमलेश सावंत, महादेव अभ्यंकर, नचिकेत पर्णपुत्रे आणि अभिनेत्री सीमा देशमुख यांचा उत्तम अभिनय पाहायला मिळणार आहे. 

हेही वाचा : दिया मिर्झाची नव्याने सुरुवात; पाहा लग्नसोहळ्यातील खास क्षण

कालच अभिनेता अमेय वाघ याच्या झोम्बिवली या मराठी चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. मराठीतला पहिला झोम्बीपट म्हणून त्या चित्रपटाची जाहिरात करण्यात आली आहे. सोशल मीडियावर तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.