esakal | 'मामी, एवढी पेट्रोलवाढ झाली हे काय बरं नाही' 
sakal

बोलून बातमी शोधा

actor siddharth takes finance minister Nirmala sitharaman Maami is next level flexible in her belief system

सिध्दार्थनं अर्थमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने त्यांच्या आर्थिक धोरणावर टीका केली आहे.

'मामी, एवढी पेट्रोलवाढ झाली हे काय बरं नाही' 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - देशभरात दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला न परडवणारे दर आता पेट्रोलचे झाले आहेत. त्यावरुन नागरिकांध्ये नाराजी आहे. दुसरीकडे काही सेलिब्रेटींनी सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीविषयी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. रंग दे बसंतीमधील प्रसिध्द कलाकार सिध्दार्थची प्रतिक्रिया व्हायरल झाली असून त्यावरुन चर्चा रंगली आहे.

सिध्दार्थनं अर्थमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने त्यांच्या आर्थिक धोरणावर टीका केली आहे. सध्या पेट्रोलचे दर 100 रुपये प्रतिलीटर एवढे आहेत. त्याचा निषेध म्हणून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स तयार व्हायला लागले आहेत. सिध्दार्थ सोशल मीडियावर चर्चेत असणारा अभिनेता आहे. तो सामाजिक, राजकीय विषयांवर बिनधास्तपणे प्रतिक्रिया देण्यासाठी ओळखला जातो. त्याचं झालं असं की, प्रख्यात वकील प्रशांत भुषण यांनी निर्मला सीतारामन यांच्या दोन विधानांवर चर्चा करण्यात आली आहे.

2013 मध्ये जेव्हा कॉग्रेसचे सरकार होते तेव्हा देखील निर्मला सीतारामन यांनी त्या सरकारला पेट्रोलचे दर वाढले म्हणून दोषी ठरवले होते. आता तेच म्हणत आहेत की तेलाचे भाव वाढण्यामागे त्याचे उत्पादन करणा-या कंपन्या आहेत. प्रशांत भुषण यांच्या त्या व्टिटवर सिध्दार्थ याने प्रतिक्रिया दिली होती.  सिध्दार्थनं लिहिले आहे की, मामी, ज्यावर विश्वास ठेवतात त्यानुसार बदलत जातात. असे आतापर्यत दिसून आले आहे. मग त्यात कांदा, आश्वासनांचा पडलेला विसर हे सगळे आले. मामी रॉक्स असे त्यानं म्हटलं आहे.

हेही वाचा : 'एक जमाना था जब हम भी..'; लहान भावाच्या जन्मानंतर तैमुरवरून भन्नाट मीम्स व्हायरल 

सीतारामण म्हणाल्या होत्या की, इंधन दरवाढ हा असा एक मुद्दा आहे की त्यात जनतेला संतुष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे जी वास्तविकता आहे ती समोर आणणं गरजेचं आहे. तेव्हाही लोकांना वाटेल की मी दोन्ही बाजूंनी बोलत आहे म्हणून. हा खरोखर खूप गंभीर मुद्दा आहे. पेट्रोलच्या किंमतीवर सरकारचे कुठलेच नियंत्रण नाही. तेल कंपनी कच्च्या तेलाची आयात करतात. ते रिफाईन करतात आणि त्याचे वितरण करतात. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.