esakal | ज्या पुरूषांकडे संयम नाही त्यांना नपुंसक बनवलं पाहिजे; सिध्दार्थ शुक्ला यांच इम्रान खान यांना उत्तर

बोलून बातमी शोधा

actor  sidharth  shukla  reacts   Pakistan  pm  Imran  khan  comment rape  cases.jpg

सिध्दार्थने पाकिस्ताच्या पंतप्रधानांना सडेतोड सुनावले आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्ताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्काराच्या घटनांवरून एक वक्तव्य केले.

ज्या पुरूषांकडे संयम नाही त्यांना नपुंसक बनवलं पाहिजे; सिध्दार्थ शुक्ला यांच इम्रान खान यांना उत्तर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बिग बॉस सिझन 13 चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचा चाहता वर्ग मोठा आहे. छोटया पडद्यावरच्या या कलाकाराच्या प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते. सिध्दार्थने चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. एक ट्विट केल्याने सिध्दार्थ चर्चेत आला आहे.

सिध्दार्थने पाकिस्ताच्या पंतप्रधानांना सडेतोड सुनावले आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्ताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्काराच्या घटनांवरून एक वक्तव्य केले. इम्रान म्हणाले होते की, बलात्कार घटनांना अश्लिलता, पाश्चिमात्य आणि भारतीय संकृती जबाबदार आहे, प्रत्येक पुरूषाकडे इतका संयम नसतो. अश्लिलता वाढत असेल तर त्याचे परिणामही भोगावे लागतील.’ त्यांच्या या वक्तव्यामुळे सिध्दार्थची तळ पायाची आग मस्तकात गेली आणि त्याने इम्रान खानच्या वक्तव्याला उत्तर दिले.

 
सिध्दार्थने ट्विट केले, ’वाह रे दुनिया वालो. मग तर अशा प्रकरणात ज्या पुरूषांकडे संयम नाही म्हणता, त्यांना नपुंसक बनवले पाहिजे.’ या ट्विटला अनेक नेटकऱ्यांनी रिप्लाय दिला आहे. 

पाकिस्ताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी दोन तास नागरिकांसोबत फोनवर चर्चा केली. यावेळी एका नागरिकाने बलात्कार आणि लहान मुलांचे शोषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल प्रश्न विचारला यावर नाराजी व्यक्त करून ’बलात्कार घटनांना अश्लिलता, पाश्चिमात्य आणि भारतीय संकृती जबाबदार आहे, प्रत्येक पुरूषाकडे इतका संयम नसतो. अश्लिलता वाढत असेल तर त्याचे परिणामही भोगावे लागतील असे सांगितले. तसेच त्यांनी धर्मावर मत मांडत इस्लाम धर्मात बुरखा घालणे महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. यामुळे प्रलोभनाला नियंत्रित करता येते असा दावा त्यांनी केला. अभिनेता सिध्दार्थने इम्रान खान यांना दिलेल्या उत्तरामुळे आता सोशल मिडीयावर या विषय़ी चांगलीच चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे.