esakal | हायप्रोटीन घेणं, कधीही झोपणं असं रुटीन होतं सिद्धार्थचं, शेवटी...
sakal

बोलून बातमी शोधा

हायप्रोटीन घेणं, कधीही झोपणं असं रुटीन होतं सिद्धार्थचं, शेवटी...

हायप्रोटीन घेणं, कधीही झोपणं असं रुटीन होतं सिद्धार्थचं, शेवटी...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला bollywood actor sidhartha shukla याचा मृत्यु हार्ट अॅटकनं झालायं असं सांगण्यात आलं आहे. मात्र त्याच्या मृत्युमागील खरं कारण काय हे अद्याप समोर येणं बाकी आहे. अशा प्रकारची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली दिसते आहे. आता तर सिद्धार्थचं रोजजं रुटीनं कसं होतं यावरही सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट दिसत आहेत. त्यावरुन त्याच्या व्यस्त वेळापत्रकाचा त्याच्या प्रकृतीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. सिद्धार्थच्या मृत्युची बातमी ऐकताच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्याला आदरांजलीही वाहिली आहे. बॉलीवूडचा सिंघम अजय देवगणनं त्यावरुन एक व्टिट केलं आहे. त्यात तो म्हणतो, मृत्युला कोणी चकवा दिलेला नाही. मात्र फार कमी वयात सिद्धार्थचं जाणं हे मनाला चटका लावून जाणारं आहे. अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे.

मनोरंजनाच्या क्षेत्रात भलेही सिद्धार्थ हा प्रेक्षकांचा लोकप्रिय अभिनेता होता. मात्र त्याच्या काही सवयीनं त्याला धोक्यात टाकल्याचे दिसून आलं आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला पुरेशा विश्रांतीसाठी वेळ मिळत नसल्याचे दिसून आले आहे. त्याच्या या बिझी रुटीनचा फटका त्याला बसला आहे. सिद्धार्थ हा नेहमी हाय प्रोटीन घेत असल्याचे दिसुन आले आहे. याशिवाय त्यानं आपल्या शरीरावर काही प्रयोगही केले होते. अतिरिक्त वर्कआऊटनं त्याच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याची झोप नियमित नसल्याचेही दिसून आले आहे. यासगळ्याचा वाईट परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: मुंबई पोलिसांनी सिद्धार्थची कार केली जप्त; काल रात्री काय घडलं?

सिद्धार्थचं वय अवघं ४० वर्षाचं होतं. आणि त्याचा मृत्यु हा हद्यविकाराच्या झटक्यानं झाल्याचे सांगण्यात आलं आहे. दिसण्यास अगदी रुबाबदार असणाऱ्या सिद्धार्थचा सोशल मीडियावर बोलबाला होता. तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारा सेलिब्रेटी होता. एवढ्या कमी वयात त्याला हार्ट अॅटॅक येणं ही चर्चेची गोष्ट झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ भलेही मोठा कलाकार असला तरी त्याच्या काही सवयी या वाईट होत्या. तो नेहमी हाय प्रोटीन घेत होता. त्यानं काही शस्त्रक्रियाही केल्याची माहिती समोर आली आहे.

loading image
go to top