Sohail and Seema Divorce Case:अरबाजनंतर आता सोहेलच्या संसाराला घरघर! पत्नी सीमाचा घटस्फोटाचा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Sohail Khan's divorce news Viral on social media

अरबाजनंतर आता सोहेलच्या संसाराला घरघर! पत्नी सीमाचा घटस्फोटाचा अर्ज

'सलमान लग्न का करत नाही?' असा कायम प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होतो.मात्र सलमानने या प्रश्नांना कधीही गांभिर्याने घेतले नाही.सलमानचे लग्न होण्याआधीच मात्र त्याच्या भावंडांची लग्न टुटण्यावर आलेली दिसते.अरबाजचा घटस्फोट तर झालाच आहे.(Sohail Khan)आता मात्र मागोमाग सोहेलच्याही घटस्फोटाची बातमी पुढे येतेय.सोहेलची पत्नी सीमा खान हीने कोर्टात नुकताच घटस्फोटासाठी अर्ज केला असल्याची बातमी पुढे येते आहे.

अनेक चित्रपटांत सोहेलने त्याच्या कॉमेडी सीन्सने प्रेक्षकांना हसवले आहे.त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले असले तरी त्याच्या अभिनयाने लोकांना खळखळून हसवले आहे.१९९८ मधे त्याचे सीमाशी लग्न झाले होते.मात्र २४ वर्षांच्या सुखी संसारानंतर आता त्यांच्या घटस्फोटाची धक्कादायक बातमी पुढे येतेय.क्वचितच स्पॉट केल्या जाणाऱ्या या जोडप्याने त्यांच्या घटस्फोटाची ऑफिशिअल घोषणा अजून केली नसली तरी त्यांना पॅपराजीने काल कोर्टाबाहेर स्पॉट केले आहे.त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.या जोडप्याला दोन मुले देखिल आहे.(Divorce)त्यांचे नाव आहे 'निर्वान खान' आणि 'योहान खान'.त्यापैकी त्यांचा दुसऱ्या मुलाचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला होता.मागल्या वर्षीच या जोडप्याने एकत्र निर्वानचा १० वा वाढदिवस साजरा केला.

सोहेल आणि सीमा काही दिवसांपासून वेगळे राहत असल्याची चर्चा होती.मात्र काल त्यांना त्यांच्या फॅमिली कोर्टाबाहेर पॅपराजीने स्पॉट केले.त्यावेळी हे जोडपे घटस्फोटाची केस फाईल करायला गेले असल्याचे कळते आहे.त्यांनी घटस्फोटाची केस फाईल केली असली तरी ते अजूनही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे कळते आहे.सोहेल आणि सीमाच्या लग्नाला सीमाच्या कुटुंबियांची सहमती नव्हती.या जोडप्याने लपून त्यांच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केले होते.लग्नानंतर या जोडप्याला दोन मुलेही झाली.तब्बल २४ वर्षानंतर या जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय का घेतला हे अजूनही उघड झालेले नाही.

Web Title: Actor Sohail Khans Wife Seema Khan Registered Divorce Case In The Court Yesterday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top